ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मॅग्नम’चे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

आयटी क्षेत्राला चालना देण्यासाठी पुढाकार : आमदार शंकर जगताप, अमित गोरखे यांची उपस्थिती

पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला आणखी मोठी चालना देणाऱ्या द मॅग्नम आईसक्रीम कंपनीच्या ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC) चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्राच्या कोनशिलेचे अनावरणही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.

या ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरच्या माध्यमातून कंपनीच्या जागतिक स्तरावरील विविध व्यावसायिक आणि कार्यात्मक गरजांना तांत्रिक व व्यवस्थापकीय सहाय्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक पट्ट्याला जागतिक कंपन्यांच्या गुंतवणुकीसाठी आणखी एक महत्त्वाचे स्थान मिळण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा –  चिंचवडच्या प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँण्ड ज्युनिअर कॉलेज मध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा

उद्घाटनप्रसंगी आमदार अमित गोरखे, आमदार शंकर जगताप, द मॅग्नम आईसक्रीम कंपनीचे कार्यकारी संचालक (CFO) अभिजित भट्टाचार्य, कंपनीचे मध्य पूर्व, तुर्की आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष तोलोय तानरिदाग्ली यांच्यासह कंपनीचे अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक क्षमतेला जागतिक व्यासपीठ

पिंपरी-चिंचवड हे पारंपरिक उत्पादन उद्योगासोबतच आता आधुनिक सेवा, तंत्रज्ञान आणि जागतिक व्यावसायिक केंद्रांसाठीही महत्त्वाचे ठिकाण म्हणून विकसित होत आहे. मॅग्नम आईसक्रीम कंपनीच्या GCC मुळे या प्रवासाला आणखी बळ मिळणार असून, शहराची जागतिक औद्योगिक ओळख अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या या उद्घाटनामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्तारासाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याचा संदेशही अधोरेखित झाला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“पिंपरी-चिंचवडमध्ये ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरची सुरुवात होणे ही शहराच्या औद्योगिक आणि सेवा क्षेत्राच्या वाढत्या सामर्थ्याची पावती आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक, रोजगार आणि नव्या तंत्रज्ञानाच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. जागतिक कंपन्यांनी महाराष्ट्राला पसंती देत आपल्या विस्तारासाठी येथे गुंतवणूक करावी, यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य सरकारकडून केले जाईल.”

– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group