ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकडमध्ये ६०० हून अधिक नागरिकांना मोफत NCMC स्मार्ट कार्डचे वाटप

वाकड : नागरिकांना सार्वजनिक वाहतूक सेवेचा अधिक सुलभ आणि सोयीस्कर लाभ मिळावा, या उद्देशाने आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रणजित आबा कलाटे फाउंडेशनच्या वतीने मोफत NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. वाकड येथील सौ. स्नेहा रणजित कलाटे जनसंपर्क कार्यालयात हा उपक्रम पार पडला.

‘काम हीच ओळख, सेवा हीच शक्ती’ या ब्रीदवाक्यानुसार आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात परिसरातील ६०० हून अधिक नागरिकांना मोफत NCMC स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले. नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे आणि रणजित आबा कलाटे यांच्या हस्ते नागरिकांना कार्डचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घेतला. सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ, आधुनिक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

हेही वाचा –  नाशिक-रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; गिरीश महाजन, भरत गोगावले यांच्यावर जबाबदारी

मोफत NCMC स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले. नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद भविष्यातही अशाच लोकाभिमुख आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे स्नेहा रणजित कलाटे यांनी सांगितले.

“नागरिकांची सुविधा आणि सेवा हाच आमचा संकल्प आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यातही अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल,” असे स्नेहा रणजित कलाटे यांनी सांगितले.

उपक्रमाचा लाभ घेतलेल्या सर्व महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांचे रणजित आबा कलाटे फाउंडेशनच्या वतीने आभार मानण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button