भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी-२० संग्राम! सामने कधी, कुठे आणि किती वाजता? जाणून घ्या..

IND vs ZIM | आयर्लंड आणि इंग्लंडच्या निराशाजनक दौऱ्यांनंतर भारतीय क्रिकेट संघ आता झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय युवा संघ झिम्बाब्वेमध्ये दाखल झाला आहे. या दौऱ्यासाठी व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्यावर प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या दौऱ्यात भारतीय संघात सर्वाधिक चर्चा असलेला खेळाडू म्हणजे वैभव सूर्यवंशी. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पदार्पण करत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता. इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही डावांत अपयशी ठरल्यानंतर आता झिम्बाब्वेविरुद्ध आपली फलंदाजीची क्षमता सिद्ध करण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर असणार आहे.
थेट प्रक्षेपण कुठे पाहावे?
भारताच्या टी-२० मालिका आपण स्टार स्पोर्ट्स जिओ हॉटस्टार आणि सोनी स्पोर्ट्स या चॅनेलवर पाहत असतो. पण यावेळेस मात्र झिम्बाब्वेविरूद्धची मालिका या चॅनेलवर जिओ हॉटस्टार, सोनी लिव्ह अॅपवर पाहायला मिळणार नाही. तर टीव्ही चॅनेलवर या मालिकेचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी झी युनाईट8 स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येईल. तर डी डी स्पोर्ट्स या चॅनेलवर मालिका मोफत पाहता येणार आहे. त्याशिवाय मोबाईलवर ही मालिका लाईव्ह पाहायची असेल तर फॅनकोड हा अॅप डाऊनलोड करावा लागणार आहे.
हेही वाचा
आषाढी वारी पालखी सोहळ्यात ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्ट तर्फे लाखो वारकऱ्यांची आरोग्यसेवा
भारत आणि झिम्बाब्वे मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार दुपारी ४.३० वाजता सुरू होतील. झिम्बाब्वेच्या हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये हे तिन्ही सामने खेळवले जातील. पहिला सामना २३ जुलैला तर उर्वरित दोन सामने शनिवारी २५ जुलै व रविवार २६ जुलै रोजी खेळवले जातील.
भारतीय संघ:
श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव, रवी बिश्नोई.
झिम्बाब्वे संघ:
सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, बेन करन, ब्रॅड इव्हान्स, क्लाइव्ह मदांडे (यष्टीरक्षक), टिनोटेंडा मापोसा, तादिवानाशे मारुमनी, वेलिंग्टन मसाकादझा, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायोन मायर्स, रिचर्ड नगारवा, न्युमैन न्यामुरी, मिल्टन शुंबा.




