Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

रणबीर कपूरच्या ‘रामायण’मध्ये जटायू कोण साकारणार? नवीन अपडेट समोर

Ramayana : नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित रामायण चित्रपटाची स्टार कास्ट सातत्याने चर्चेत आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि सनी देओल यांच्यासह अनेक कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. जटायूच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांचे नाव दीर्घकाळ चर्चेत असले, तरी काही नव्या चर्चांमुळे दुसऱ्या अभिनेत्याच्या नावाचीही चर्चा रंगली आहे.

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिला भाग दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या रिलीजपूर्वी निर्माते ट्रेलर लाँच करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, रिलीजपूर्वीच ट्रेलर सोशल मीडियावर लीक झाला आणि मोठी चर्चा रंगली.

ट्रेलरची झलक समोर आल्यानंतर चित्रपटातील कलाकारांच्या लूकची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, यशच्या रावणाच्या अवताराने प्रेक्षकांचे अधिक लक्ष वेधून घेतले आहे. माता सीता, हनुमान यांच्यानंतर जटयूच्या भूमिकेसाठी एका दिग्गज अभिनेत्याचे नाव समोर आले आहे.

हेही वाचा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रेशीम संचालनालय आणि बाएफ यांच्यात सामंजस्य करार

‘रामायण’ चित्रपटाची स्टारकास्ट जवळपास निश्चित झाली आहे. काही महत्त्वाच्या भूमिकांबाबत अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. नुकतेच महादेवाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे नाव समोर आल्यानंतर आता जटायूच्या भूमिकेबाबतही मोठी माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमिताभ बच्चन जटायूच्या पात्राला आवाज देणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, नव्या माहितीनुसार या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले जात आहे.

रिपोर्टनुसार, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर ‘रामायण’मधील जटायू या महत्त्वाच्या पात्रासाठी आवाज देणार आहेत. मात्र, निर्मात्यांकडून अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

‘रामायण’मध्ये यश साकारत असलेल्या रावण आणि जटायू यांच्यातील संघर्ष हा चित्रपटातील महत्त्वाचा प्रसंग असणार आहे. अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमात दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी या दृश्याबाबत भाष्य करताना, रावण आणि जटायू यांच्यातील युद्ध पडद्यावर किती भव्य आणि भावनिक पद्धतीने साकारले आहे, याचा अनुभव प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यानंतरच येईल, असे सांगितले.

निर्माते नमित मल्होत्रा आणि अभिनेता यश यांच्या सहनिर्मितीत साकारत असलेला ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. सुमारे ४,००० कोटी रुपयांच्या बजेटसह तयार झालेल्या या चित्रपटाचा पहिला भाग यंदाच्या दिवाळीत, तर दुसरा भाग पुढील वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज केला जाणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button