Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर ‘आर-पारची’ लढाई!कसा आहे दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

India vs England Head To Head Record: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. ही मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आहे. त्यामुळे मालिकेतील तिसरा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक असणार आहे. हा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने पुनरागमन केलं आणि दमदार विजयाची नोंद केली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही इंग्लंडचं पारडं जड असणार आहे. कारण मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या मैदानावर कसा आहे दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या.

लॉर्ड्सचं मैदान हे ऐतिहासिक मैदान आहे. त्यामुळे या मैदानावर विजय मिळवणं नेहमीच खास असतं. भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आतापर्यंत लॉर्ड्सच्या मैदानावर ७ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने ३ सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडने देखील ३ सामने जिंकले आहेत. यादरम्यान एका सामन्याचा निकाल लागू शकला नव्हता. त्यामुळे दोन्ही संघ बरोबरीत आहे. आता लॉर्ड्सच्या मैदानावर कोणता संघ बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा –  साखरेची तीव्र इच्छा कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी सुचवलेले हेल्दी स्नॅक्स : नैसर्गिकरीत्या गोड खाण्याची सवय नियंत्रित करण्याचे उपाय

रोहितचा शेवटचा वनडे सामना?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना सुरु असताना अशा चर्चा रंगल्या होत्या की, लॉर्ड्सच्या मैदानावर होणारा तिसरा वनडे सामना हा रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो. रोहित शर्मा वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेच्या सेटअपचा भाग नसल्याची माहिती समोर आली होती. पण बीसीसीआयचे सचिव देवजीय सैकिया यांनी स्पष्ट केलं आहे की, लॉर्ड्सच्या मैदानावर होणारा सामना हा रोहितच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना नसेल. रोहित आणि बीसीसीआयमध्ये अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे निवृत्ती घेतोय, या केवळ अफवा आहेत.

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली*, श्रेयस अय्यर (उप-कर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button