Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

चर्चा ‘खाशाबा’ची… पण नागराज मंजुळेंचा ‘हा’ सिनेमा OTT वर घालतोय धुमाकूळ; शेवट पाहून बसेल धक्का

Nagraj Manjule’s ‘Frame’ Cinema : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुप्रतिक्षित ‘खाशाबा’ सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू असतानाच त्यांच्या आणखी एका सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. १० जुलै रोजी ‘फ्रेम’ नावाचा सिनेमा झी फाइव्ह या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित करण्यात आला.

या सिनेमातील थक्क करणाऱ्या अभिनयाने नागराज मंजुळे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे या सिनेमाने झी ‘फाइव्ह’वर प्रेक्षकांची पसंती मिळवत असून टॉप ट्रेंडिंग सिनेमांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर झळकत आहे.

‘फ्रेम’ला सुरुवातीपासूनच सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ओटीटीवर येऊन या सिनेमाला एक आठवडा पूर्ण झाला असून, सिनेमाची दमदार कथा, वास्तववादी मांडणी आणि कलाकारांचा प्रभावी अभिनय यामुळे सोशल मीडियावरही या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे.

हेही वाचा –  ‘कर्करुग्ण उपचारासाठी महाकेअरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार व संशोधन सुविधा निर्माण कराव्यात’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या सिनेमातील विषय समाजातील गंभीर प्रश्नांवर विचार करायला भाग पाडतो. व्यावसायिक जबाबदारी आणि माणुसकी यांच्यातील संघर्ष, नैतिक मूल्यांची कसोटी आणि कठीण प्रसंगी घ्यावे लागणारे निर्णय यांचा अचूक वेध घेणारा फ्रेम शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन विक्रम पटवर्धन यांनी केलं आहे. नागराज मंजुळे यांच्यासह अमेय वाघ, मुग्धा गोडसे आणि अक्षया गुरव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या असून सर्व कलाकारांच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.

सिनेमाची कथा चंदू पानसरे या फोटो जर्नालिस्टच्या भोवती फिरते. एखाद्या दुर्घटनेचे छायाचित्र टिपताना व्यावसायिक कर्तव्य आणि मानवी संवेदना यामध्ये कसा संघर्ष करावा लागतो, याचे वास्तववादी चित्रण सिनेमात दाखवण्यात आलं आहे.

या सिनेमाचा शेवट ज्या प्रकारे करण्यात आला आहे. त्यातून विविध प्रश्न निर्माण होऊन त्यांची उत्तरं शोधण कठीण होतं. थोडक्यात मनाला भिडणारा सिनेमा म्हणून फ्रेमकडे पाहलं जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button