ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेत झळकणार दिवंगत अजितदादा, लक्ष्मणभाऊ व अहिल्यादेवी होळकर यांची तैलचित्रे

स्थायी समितीच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला होणार सुरुवात

Share On

सभापती अभिषेक बारणे यांच्या पुढाकाराला यश

पिंपरी | पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार, माजी आमदार दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तैलचित्रे लावण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव गुरुवारी (ता. 16) होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या पुढाकारामुळे हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोहोचला असून त्यांच्या मंजुरीनंतर ही तैलचित्रे महापालिकेच्या मुख्यालयात व सभागृहात झळकणार आहेत.

महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रस्तावानुसार, मुख्य प्रशासकीय इमारतीच्या दर्शनी भागात दिवंगत अजितदादा पवार व दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप यांची तैलचित्रे लावण्यात येणार आहेत. तसेच, महापालिका सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार थेट पद्धतीने काम देण्यास मान्यता घेण्यात येणार आहे.

यापूर्वी महापालिका सभेने अजितदादा पवार व लक्ष्मणभाऊ जगताप यांची तैलचित्रे लावण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर महापौरांकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे तैलचित्र सभागृहात लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार तिन्ही तैलचित्रे बसविण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे.

हेही वाचा

डेंग्यू, मलेरियाविरुद्ध पिंपरी चिंचवड महापालिकेची व्यापक प्रतिबंध मोहीम

प्रस्तावानुसार, चित्रकार सुनील शेगावकर यांच्याकडून ही तैलचित्रे तयार करण्यात येणार आहेत. अजितदादा पवार व लक्ष्मणभाऊ जगताप यांची प्रत्येकी ८ बाय ५ फूट, तर अहिल्यादेवी होळकर यांचे ६ फूट ६ इंच बाय ४ फूट आकाराचे तैलचित्र तयार करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक खर्च महापालिकेच्या अंदाजपत्रकातील विशेष योजनेतून करण्यात येणार आहे. महापालिकेच्या मुख्यालयात यापूर्वी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे तैलचित्रही याच चित्रकाराने तयार करून दिले असून त्याच्या धर्तीवर ही तैलचित्रेही उभारली जाणार आहेत.

अजितदादा, लक्ष्मणभाऊ व अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची भावी पिढीला मिळणार प्रेरणा

महापालिकेच्या मुख्यालयात शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या नेत्यांची स्मृती जपली जावी आणि भावी पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला. प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करून तो स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. गुरुवारी होणाऱ्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर तैलचित्रे लावण्याच्या कामाला गती येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापालिकेच्या इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तिंचे कार्य नागरिकांसमोर कायमस्वरूपी राहावे आणि महापालिकेत त्यांचा सन्मानपूर्वक गौरव व्हावा, या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button