सरकारकडून Bharat Taxi App लाँच, चालक आणि प्रवासी दोघांना परवडेल, टॅक्सीचे फायदे काय?

Bharat Taxi App : महाराष्ट्र शासन आणि सहकार मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारत टॅक्सी’ सेवेचा भव्य शुभारंभ व लोकार्पण सोहळा नवी मुंबई विमानतळ येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भारत टॅक्सी’ चा शुभारंभ केला जाणार आहे. एकाच मोबाईल अॅपवरून कार, ऑटो-रिक्षा आणि बाईक टॅक्सी बुकिंगची सुविधा. प्रवासी आणि चालक यांना थेट जोडणारी व्यवस्था. मध्यस्थ कमी होऊन सेवा अधिक पारदर्शक व सुलभ होणार. परवडणारी आणि आधुनिक टॅक्सी सेवा देण्याचा सरकारचा दावा.
हेही वाचा – युद्धाची झळ HPCL, BPCL कंपनींना, पहिल्या तिमाहीत मोठा तोटा, नुकसान भरपाई करण्यासाठी पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार?
केंद्रीय सहकार मंत्रालयाची महत्त्वाकांक्षी योजना. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) आणि 7 प्रमुख राष्ट्रीय सहकारी संस्थांच्या सहकार्याने अंमलबजावणी. पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 31 रुपये. त्यानंतर प्रति किलोमीटर 21 रुपये. काळी-पिवळी टॅक्सीच्या धर्तीवर भाडे निश्चित. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुण्यात सेवा सुरू होणार. यासाठी संबंधित सहकारी संस्थांची निवड करण्यात आली आहे. राज्याचे एग्रीगेटर धोरण अंतिम करण्यात आले. नागरिकांच्या सूचना समाविष्ट करून नियम निश्चित. अॅप-आधारित कॅब सेवांसाठी कायदेशीर चौकट तयार. कार्यक्रमाचे नियंत्रण अधिकारी म्हणून पुण्याचे सहकार आयुक्त व निबंधक नियुक्त. सर्व आर्थिक व्यवहारांवर त्यांचे नियंत्रण राहणार. शासन निर्णय वित्त विभागाच्या अधिकारांतर्गत डिजिटल स्वाक्षरीसह प्रसिद्ध. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अॅपचे फायदे सांगितले आहे.





