लिओनेल मेस्सीचा वर्ल्ड रेकॉर्ड! वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक गोल करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

Lionel Messi | अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने पुन्हा एकदा जागतिक फुटबॉलमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) स्पर्धेत २२ जून रोजी डॅलस येथे अर्जेंटिना आणि ऑस्ट्रिया यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यात मेस्सीने इतिहास घडवला. या सामन्यात केलेल्या शानदार गोलच्या जोरावर मेस्सी आता फिफा विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे. या कामगिरीसह त्याने स्वतःला या खेळातील सर्वकालीन महान खेळाडूंच्या अग्रस्थानी नेऊन ठेवले आहे.
३८ वर्षीय लिओनेल मेस्सीने ऑस्ट्रियाविरुद्धच्या सामन्यात आपल्या विश्वचषक कारकिर्दीतील १७ वा गोल नोंदवला. या गोलसह त्याने जर्मनीचा दिग्गज खेळाडू मिरोस्लाव क्लोस याचा १६ गोल्सचा २० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला.
सामन्याच्या सुरुवातीला पेनल्टी किकवर गोल करण्याची संधी हुकल्यानंतर, साधारण अर्ध्या तासाने म्हणजेच ३८ व्या मिनिटाला मेस्सीने मैदानातून अप्रतिम गोल करत हा इतिहास रचला. पेनल्टी हुकल्यामुळे मेस्सीची सलग दुसरी विश्वचषक हॅटट्रिक मात्र हुकली, पण त्याने याच सामन्यात पुढे आणखी एक गोल करत आपल्या गोल्सची संख्या १८ वर पोहोचवली.
हेही वाचा
४१२ कोटी रुपयांच्या मालमत्ता कर संकलनाचा टप्पा पार
६ वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धा खेळणारा जगातील पहिला खेळाडू
२०२६ च्या फिफा विश्वचषकापूर्वी मेस्सीच्या नावावर ५ विश्वचषक स्पर्धांमध्ये एकूण १३ गोल होते. या चालू स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात अल्जेरियाविरुद्ध शानदार हॅट्ट्रिक साधत त्याने मिरोस्लाव क्लोजच्या १६ गोल्सच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. त्यानंतर सोमवारी ऑस्ट्रियाविरुद्ध आपला १७ वा आणि १८ वा गोल करत त्याने क्लोसला मागे टाकले.
विशेष म्हणजे, अल्जेरियाविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच ६ वेगवेगळ्या फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभागी होणारा मेस्सी हा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. मेस्सीने सलग सहा फिफा विश्वचषक सामन्यांमध्ये गोल करण्याचा पराक्रमही केला आहे. या कामगिरीमुळे तो आता फ्रान्सचा जस्ट फॉन्टेन आणि ब्राझीलचा जैरझिन्हो यांसारख्या दिग्गजांच्या प्रतिष्ठित गटात सामील झाला आहे.
फिफा विश्वचषक इतिहासात सर्वाधिक गोल करणारे अव्वल खेळाडू:
- लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) – १८ गोल
- मिरोस्लाव क्लोज (जनी) – १६ गोल
- रोनाल्डो (ब्राझील) – १५ गोल
- गर्ड मुलर (पश्चिम जर्मनी) – १४ गोल
- कायलिन एम्बाप्पे (फ्रान्स) – १४ गोल





