Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

ओमराजे निंबाळकरांसह ६ खासदारांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश

 मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर या सहा खासदारांनी आज पक्षांतर करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बंडखोरी केलेल्या ६ खासदारांनी आज अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.

सहा टायगर येथे उपस्थित आहेत – एकनाथ शिंदे

ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर हे सहा टायगर येथे उपस्थित आहेत, या शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांचे स्वागत केले.

हेही वाचा –  विधिमंडळ कामकाज गांभीर्याने घ्या, नाहीतर…; नाराज देवेंद्र फडणवीस मंत्र्यांना म्हणाले….

आपल्याकडे ट्रिपल संजय आहेत

परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या प्रवेशामुळं आता आपल्याकडे ट्रिपल संजय आहेत अशी टिप्पणही शिंदेंनी केली.

ओमराजे रील नाही तर रिअल स्टार!

पक्षप्रवेशावेळी धाराशिवचे खासदार असलेल्या ओमराजेंवर रीलस्टार म्हणून होत असलेल्या टीकेवर शिंदेंनी प्रतिक्रिया दिली, ओमराजे हे रील नाही तर रिअल स्टार आहेत असे शिंदे यावेळी म्हणालेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button