अमेरिका आणि इराण शांतता करारावर स्वाक्षरी,युद्ध संपताच क्रूड ऑईलचे दर गडगडले, भारतात पेट्रोल डिझेल किती रुपयांना?

US Iran Deal Crude Oil : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेजश्कियान यांनी 14 कलमी करारावर स्वाक्षरी केली. या कराराचं नाव ‘इस्लामाबाद मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग बिटवीन यूएस अँड इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण’ असं नाव देण्यात आलं आहे. या करारावर दोन्ही देशांच्या प्रमुखांनी स्वाक्षरी केल्यानं अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपलं. यामुळं क्रूड ऑईलच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑईलच्या दरात 1.53 टक्क्यांची घसरण झाली असून दर 78.33 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत.
जागतिक पेट्रोलच्या दरांच्या नुसार पाकिस्तानातील पेट्रोलची सरासरी किंमत 130.82 रुपयांवरुन घसरुन 126.84 रुपयांवर पोहोचले आहेत. चीनमध्ये देखील पेट्रोलचे दर कमी झाले आहेत. चीनमधील पेट्रोलचे दर 132.81 रुपयांवरुन घसरुन 125.36 रुपये लीटरवर पोहोचले आहेत. नेपाळमध्ये देखील पेट्रोलच्या दरात घसरण झाली आहे. नेपाळमधील पेट्रोलचा दर 136.41 रुपयांवरुन घसरुन 135.47 रुपये लीटरवर आले आहेत.
बांगलादेशातील पेट्रोलचा दर 112.68 रुपयांवरुन कमी होऊन 111.51 रुपयांवर आला आहे. तर, भूतानमध्ये पेट्रोलचा दर 109.73 रुपयांवर आहे. श्रीलंकेत पेट्रोलचादर 142 रुपयांवरुन कमी होऊन 139.58 रुपयांवर आला आहे. म्यानमारमध्ये पेट्रोलचा दर 140.20 रुपयांवरुन कमी होऊन 118.37 रुपये लीटर झाले आहेत.
हेही वाचा – भारताचा सलग दुसऱ्या विजयासह धमाका, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप
भारतात पेट्रोल, डिझेलचा दर किती?
भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तेल विपणन कंपन्यांकडून कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. भारताची राजधानी नवी दिल्लीत एक लीटर पेट्रोलचा दर 102.12 रुपये इतका आहे. तर, डिझेलचा दर 95.20 रुपये लीटर आहे.
जयपूरमध्ये पेट्रोलचा दर 112.66 रुपये असून डिझेलचा दर 97.78 रुपये लीटर आहे. पाटणा येथे 1 रुपये लीटरचा दर 112.70 रुपये असून डिझेलचा दर 99.87 रुपये इतका आहे. लखनौमध्ये 1 लीटर पेट्रोल 102.05 रुपयांना मिळते तर डिझेल 99.28 रुपयांना मिळतेय. अयोध्येत पेट्रोलचा दर 102.05 रुपये असून डिझेल 99.28 रुपये लीटर आहे. अयोध्येत पेट्रोलचा दर 102.4 आणि डिझेल 97.87 रुपयांना आहे.
इंदौरमध्ये एक लीटर पेट्रोलचा दर 114.61 आणि डिझेलचा दर 99.70 रुपये लीटर आहे. भोपाळमध्ये 1 लीटर पेट्रोलचा दार 114.65 रुपये असून डिझेलचा दर 99.74 रुपये लीटर आहे.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी इराणसोबतच्या शांतता करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार इराणला संवर्धित युरेनियम साठा कमी करावा लागेल.त्याच्या बदल्यात अमेरिकेकडून निर्बंध हटवले जातील. शंतता करारामुळं इराणला आता त्यांच्याकडील क्रूड ऑईल विकता येणार आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅनुएल मॅक्रॉन यांची भेट घेतली, त्यावेळी इराणसोबतच्या करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर पेजेश्कियान यांनी स्वाक्षरी केल्यानं या कराराची तातडीनं अंमलबजावणी सुरु झाली.





