Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

‘तेरे नाम २.०…’;’ सलमानचा नवा लूक पाहून आमीर-करिनाला बसला धक्का, व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल राधे

Salman Khan: बॉलिवूडमधील गाजलेल्या ‘लगान’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाले. या निमित्ताने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात अभिनेता आमीर खान, अभिनेत्री करीना कपूर खान, जुही चावला यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. मात्र संपूर्ण कार्यक्रमात सर्वाधिक चर्चा रंगली ती अभिनेता सलमान खान याच्या नव्या हेअरस्टाइलची.

‘लगान’च्या २५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त आयोजित करण्यात आलेला हा सोहळा आठवणींनी भरलेला होता. चित्रपटाचे कलाकार, निर्माते आणि तांत्रिक टीम पुन्हा एकत्र आल्याने चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमात सलमान खानने अचानक एन्ट्री करताच सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले. यावेळी सलमान छोट्या केस आणि ब्लॅक पॅन्ट व ब्लॅक जॅकेटमध्ये दिसत आहे.

हेही वाचा –  ‘सीमावर्ती जिल्ह्यांमधील लोकसंख्याशास्त्रीय बदलांचा अभ्यास करून अहवाल सादर करा’

कार्यक्रमातील काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामध्ये आमिर खान आणि करीना कपूर सलमानकडे आश्चर्याने पाहत आहेत. सलमानचा हा लूक पाहून अनेकांना त्याच्या ‘तेरे नाम’ चित्रपटातील ‘राधे’ या लोकप्रिय पात्राची आठवण झाली.

हा व्हिडिओ पाहून नेटकरी कमेंट करत आहेत. एकाने लिहले, ‘तेरे नाम २ लवकरच येत आहे’ आणखी एकाने लिहिले, किंग इज गेटिंग ऑल्ड, आणखी एकाने लिहले, “काहीतरी मोठं येणार आहे”. मात्र हा नवा लूक नेमका कोणत्या प्रोजेक्टसाठी आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button