breaking-newsराष्ट्रिय
ईव्हीएममध्ये बिघाड, काँग्रेसचे टीकास्त्र
मध्य प्रदेश आणि मिझोराम या दोन राज्यांमध्ये आज मतदान होत असून सकाळी आठ वाजल्यापासून येथे मतदानाला सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशात २३० जागांसाठी मतदान होत असून येथील २८९९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे. येथे चौथ्यांदा विजय मिळवण्यासाठी भाजपाकडून कसून प्रयत्न केले जात आहेत. तर काँग्रेसला राज्यातील मागील १५ वर्षांचा दुष्काळ संपवायचा आहे. त्याचबरोबर मिझोराममध्ये ४० जागांसाठी मतदान होत आहे. येथे ७.७० लाखांहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.