Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

एल निनो सक्रिय अन् दुष्काळाची चिंता वाढली; पंतप्रधान मोदींकडून राज्यांना सतर्कतेचा इशारा

El Nino:  प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला असून यामुळे देशावर मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल निनोच्या परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या संकटांकडे लक्ष वेधले. राज्यांनी जलसंधारणासाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या ११वी गव्हर्निंग कौन्सिल बैठक पार पडली. यात २८ राज्ये आणि ५ केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी संभाव्य हवामान संकटांकडे लक्ष वेधले.

हवामानातील बदलांमुळे शेती, जलसाठे आणि उपजीविकेसमोर मोठी आव्हाने उभी राहू शकतात, त्यामुळे पूर्वतयारी आणि संसाधनांचे दीर्घकालीन नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीदरम्यान हवामानाशी संबंधित संकटांना तोंड देण्यासाठी देशाने एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मोदींनी राज्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण झालेल्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी विशेषतः एल निनो परिस्थितीच्या संभाव्य प्रभावाविषयी सावध राहण्याचा इशारा दिला आणि राज्यांनी जलसंधारणांच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे सांगितले.

गुरूवारी एल निनो प्रशांत महासागरात सक्रिय झाल्याची घोषणा क्लायमे प्रेडिक्शन सेंटरने केली. डिसेंबर महिन्यात हा एल निनो अति तीव्र होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्रातील सर्वांत मोठा लक्ष्मी-नारायण पूजन सोहळा!

देशातील मॉन्सूनवर याचा परिणाम पडेल. जगभरातून भारताला एल निनोचा इशारा दिला जात आहे. देशातील अनेक राज्य एल निनोच्या कचाट्यात येत आहेत. जिथे मोठा दुष्काळ पडू शकतो. मॉन्सूनचा पाऊस अत्यंत कमी पडण्याचा अंदाज आहे.

दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एल निनोबाबत शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. “राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसारच जर शेतकऱ्यांनी पेरणी केली, तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही. नेहमीच्या पद्धतीने पेरणी केली, तर पावसाच्या अभावामुळे पेरण्या वाया जातील. दुबार पेरणीची वेळ येईल”, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

अल निनो ही मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वेळोवेळी वाढण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया सामान्यतः भारतातील मान्सून कमकुवत करण्याशी संबंधित आहे. कारण अल निनो सक्रिय झाल्यानंतर भारतात पाऊस कमी पडतो. जागतिक हवामान संघटनेने यासंदर्भात आधीच इशारा दिला आहे.

ही एक अशी भौगोलिक स्थिती आहे, ज्यामध्ये प्रशांत महासागराच्या मध्य व पूर्व भागातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा कमालीचे वाढते. दर दोन ते सात वर्षांच्या अंतराने घडणाऱ्या या प्रक्रियेमुळे समुद्रावरील हवा तापून वरच्या दिशेने प्रवाहित होते, ज्यामुळे पावसाच्या नैसर्गिक वितरणात मोठा व्यत्यय येतो. संशोधकांच्या मते, यंदा उद्भवलेली ही स्थिती वर्ष १९५० नंतरची सर्वात घातक आणि शक्तिशाली ठरण्याची दाट शक्यता आहे.

२०२६ च्या मध्यापासून अल निनोची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम जगभरातील हवामान पद्धतींवर होईल असे म्हटले गेले आहे. एल निनो ही प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button