Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यभर इंधनाची उपलब्धता स्थिर; इंधन वितरणावर कोणतेही निर्बंध नाहीत

पुणे | इंडियनऑइल आपल्या विस्तृत पुरवठा आणि वितरण नेटवर्कद्वारे देशभरात पेट्रोल (एमएस),डिझेल (एचएसडी) आणि द्रवीकृत पेट्रोलियम वायू (एलपीजी) यांचा पुरेसा आणि अखंडित पुरवठा कायम ठेवत आहे.सर्व रिटेल विक्री केंद्रांवर इंधन वितरणाची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून पुरवठा कोणत्याही निर्बंधांशिवाय कायम ठेवला जात आहे. रिटेल विक्री केंद्रांचे संचालन हे पीईएसओ परवाने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या ना हरकत प्रमाणपत्रांनुसार (एनओसी) केले जाते. त्यामुळे इंधन वितरणासाठी त्यांना पीईएसओच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

पुरवठा साखळीमध्ये पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा साठा उपलब्ध असून मागणी प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी पुनर्भरणाची कामे सातत्याने सुरू आहेत. एकूण पुरवठा परिस्थिती स्थिर असून सर्व लॉजिस्टिक्स आणि वितरण वाहिन्या सुरळीत व प्रभावीपणे कार्यरत आहेत.घरगुती ग्राहकांसाठी एलपीजीचा पुरवठाही नियमितपणे सुरू असून सर्व प्रदेशांमध्ये वितरण अखंडितपणे सुरू आहे.

हेही वाचा

अनिकेत तटकरेंच्या विजयावर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या?

नागरिक,उद्योग क्षेत्र आणि कृषी ग्राहकांना आवश्यक पेट्रोलियम उत्पादनांचा अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी इंडियनऑइल राज्य सरकारे, स्थानिक प्रशासन आणि पुरवठा साखळीतील भागीदारांशी जवळून समन्वय साधून कार्य करत आहे.

ग्राहकांनी नेहमीप्रमाणे खरेदी सुरू ठेवावी आणि अनावश्यक किंवा घाबरून जाऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे. पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीच्या उपलब्धतेबाबत कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. इंधन पुरवठ्याबाबत अचूक आणि पडताळणी केलेली माहिती मिळविण्यासाठी नागरिकांनी केवळ इंडियनऑइल आणि अधिकृत संस्थांकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button