Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर पोलिसांचा छापा, ८१ गॅस सिलिंडर जप्त

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कारवाई

पिंपरी | पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर मोठी कारवाई करत तब्बल १ लाख ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत ८१ गॅस सिलिंडर हस्तगत करण्यात आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला चाकणमधील खेड़ तालुक्यातील खालुंब्रे परिसरात अवैधरित्या घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक वापरासाठी गॅस रिफिलिंग सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार २ जून रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे, पोलीस अंमलदार नितीन लोखंडे, गणेश कोकणे, अमर कदम, विनोद वीर, गणेश सावंत व विशाल गायकवाड यांनी सदर ठिकाणी छापा जय गणेश भारत गॅस या दुकानावर छापा टाकला. तपासादरम्यान घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले.

हेही वाचा

पश्चिम बंगालमध्ये ‘शिंदे पॅटर्न’ची पुनरावृत्ती! ५९ बंडखोरांसह तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट; ऋतब्रता बॅनर्जी ठरले नवे विरोधी पक्षनेते

या कारवाईत ८१ गॅस सिलिंडर, गॅस रिफिलिंगसाठी वापरली जाणारी उपकरणे व इतर साहित्य असा एकूण १ लाख ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी सचिन प्रकाश म्हस्करे (वय ३१, रा. खालुंब्रे, ता. खेड) आणि एका विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे तसेच पोलीस अंमलदार नितीन लोखंडे, गणेश कोकणे, विशाल गायकवाड, विनोद वीर, गणेश सावंत, अमर कदम, गणेश हिंगे यांनी केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button