सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका! १० दिवसात चौथ्यांदा दरवाढ, पेट्रोल २.७२ रु. डिझेल २.१८ रु. महागलं

Petrol- Diesel Price | देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. मागील अवघ्या दहा दिवसांमधली ही चौथी इंधन दरवाढ असून यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. ताज्या दरवाढीनुसार, पेट्रोलच्या किंमतीत २ रुपये ६१ पैसे प्रति लिटर, तर डिझेलच्या किंमतीत २ रुपये ७१ पैसे प्रति लिटर इतकी वाढ झाली आहे. या वाढीसह देशाची राजधानी दिल्लीत डिझेल ९५ रुपये २० पैसे प्रति लिटर, तर पेट्रोल १०२ रुपये १२ पैसे प्रति लिटरवर पोहोचले आहे.
पहिली दरवाढ १५ मे रोजी सुमारे ३ रुपयांनी झाली होती. त्यानंतर १९ मे रोजी सुमारे ९० पैशांनी, २३ मे रोजी सुमारे ९१ पैशांनी आणि आता २५ मे रोजी पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली आहे. एकूणच, गेल्या १० दिवसांत पेट्रोल प्रति लिटर ७ रुपये ३५ पैसे तर डिझेल प्रति लिटर ७ रुपये ५३ पैशांनी महाग झाले आहे. या लागोपाठच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च प्रचंड वाढणार असून याचा थेट परिणाम भाजीपाला, दूध, फळे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होऊन महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
आंबेनळी घाटात भीषण अपघात! स्कॉर्पिओ दरीत कोसळून साताऱ्यातील ८ तरुणांचा मृत्यू
मागील दहा दिवसांतील दरवाढीचा घटनाक्रम
- १५ मे २०२६: इंधनात थेट ३ रुपयांची मोठी दरवाढ
- १९ मे २०२६: इंधनाचे दर ९० पैसे प्रति लिटरने वाढले
- २३ मे २०२६: इंधनाचे दर ९१ पैसे प्रति लिटरने वाढले
- २५ मे २०२६: पेट्रोल २ रुपये ६१ पैसे तर डिझेल २ रुपये ७१ पैसे प्रति लिटरने महागले
देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे चालू दर
दिल्ली आणि मुंबईसह देशभरातील सर्वच राज्यांमध्ये इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे प्रति लिटर दर खालीलप्रमाणे आहेत:
- पाटणा: ११३ रुपये ५४ पैसे
- कोलकाता: ११३ रुपये ५१ पैसे
- मुंबई: १११ रुपये २१ पैसे
- बंगळुरु: ११० रुपये ६१ पैसे
- चेन्नई: १०३ रुपये ७७ पैसे
- गुरुग्राम: १०२ रुपये ६९ पैसे
- दिल्ली: १०२ रुपये १२ पैसे
- नोएडा: १०१ रुपये ९२ पैसे
- चंदीगड: १०१ रुपये ८९ पैसे
- लखनऊ: १०१ रुपये ८९ पैसे





