Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

देशभरात पेट्रोलचे-डिझेलचे दर पुन्हा वाढले, 5 दिवसात दुसऱ्यांदा दरवाढ

Petrol Diesel Price | ऐन उन्हाळ्यात महागाईची झळ सोसणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. आज, मंगळवारी (१९ मे) देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी ९० पैशांची वाढ करण्यात आली आहे. इंधनाच्या दरात चालू आठवड्यात झालेली ही दुसरी दरवाढ असून यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यापूर्वी गेल्या शुक्रवारीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट ३ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता अवघ्या काही दिवसांतच पुन्हा ९० पैशांची वाढ झाल्याने बाजारात महागाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मेट्रो शहरांमधील आजचे नवे दर:

मुंबई: महाराष्ट्राची राजधानी मुंबईत इंधनाचे दर नेहमीच इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत चढे असतात. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल ९१ पैशांनी महागले असून, आता एक लीटर पेट्रोलसाठी मुंबईकरांना १०७.५९ रुपये मोजावे लागत आहेत. तर दुसरीकडे डिझेलच्या दरात ९४ पैशांची वाढ झाली असून, मुंबईत डिझेल ९४.०८ रुपये प्रतिलीटरवर पोहोचले आहे.

हेही वाचा

विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत सामाजिक मूल्ये आत्मसात करावीत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल ८७ पैशांनी महागून ९८.६४ रुपये प्रतिलीटर झाले आहे, तर डिझेल ९१ पैशांच्या वाढीसह ९१.५८ रुपये प्रतिलीटरवर विकले जात आहे.

कोलकाता: कोलकातामध्ये पेट्रोलमध्ये सर्वाधिक म्हणजेच ९६ पैशांची वाढ झाली असून तिथे पेट्रोलचा दर १०९.७० रुपयांवर पोहोचला आहे.

निवडणुका संपताच पेट्रोलियम कंपन्यांचा धडाका

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर इंधन दरवाढीचे सत्र पुन्हा सुरू होईल, अशी शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती. तोच अंदाज आता खरा ठरताना दिसत असून पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा धडाका लावला आहे. शुक्रवारी झालेली ३ रुपयांची वाढ आणि आजची ९० पैशांची वाढ मिळून, सर्वसामान्यांवर अवघ्या एका आठवड्यात प्रतिलिटर ३ रुपये ९० पैशांचा अतिरिक्त बोजा पडला आहे. या दरवाढीमुळे मालवाहतूक महागण्याची आणि पर्यायाने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button