ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आठवणींचे गाठोडे : ज्येष्ठ नागरिकांच्या सहलीतील आठवणींचे संकलन!

भाजपा नगरसेवक संदीप कस्पटे यांच्याप्रति कृतज्ञतेचा अनोखा आविष्कार

पिंपरी-चिंचवड | वाकड येथील पार्क स्ट्रीट संकुलातील टरक्वॉइज सोसायटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सहलीतील आठवणींना उजाळा देणारा आगळावेगळा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. भाजपा नगरसेवक संदीप आण्णा कस्पटे यांनी आयोजित केलेल्या दिवेआगर सहलीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

काही दिवसांपूर्वी श्री. कस्पटे यांनी तब्बल सातशे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिवेआगर येथे एकदिवसीय विरंगुळा सहल आयोजित केली होती. सहलीतील नियोजन, व्यवस्था आणि आत्मीयतेमुळे ज्येष्ठ नागरिक भारावून गेले होते. सहलीनंतर अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅप संदेश, लेख, कविता, ऑडिओ संदेश तसेच छायाचित्रांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.

या सर्व आठवणी आणि प्रतिक्रिया यांचे संकलन करून पार्क स्ट्रीट ज्येष्ठ नागरिक संघाने “आठवणींचे गाठोडे” ही स्मरणिका प्रकाशित केली. श्री. संदीप आण्णा कस्पटे यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. स्मरणिकेतील आशय, मांडणी, छायाचित्रे तसेच मुखपृष्ठावरील कल्पकतेचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

यावेळी बोलताना श्री. कस्पटे यांनी स्मरणिकेचे संपादक ज्येष्ठ नागरिक श्री. अरुण देशमुख यांचे विशेष कौतुक केले. “असे कल्पक आणि दर्जेदार काम देशमुख काकाच करू शकतात,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सहकाऱ्यांचा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

हेही वाचा

दहावीचा निकाल ९२.९ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी, कोकण विभाग अव्वल

स्मरणिकेबाबत माहिती देताना श्री. अरुण देशमुख यांनी सांगितले की, पार्क स्ट्रीट संकुलातील अनेक रहिवाशांना मराठीचे संपूर्ण ज्ञान नसल्याने स्मरणिकेतील मजकूर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात जागतिक योगासन स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झालेल्या कुमार गोकर्ण शर्मा याचा विशेष सत्कार करण्यात आला. समारंभाला उद्योजक संतोष बापू कस्पटे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रसाद कस्पटे, पार्क स्ट्रीट महासंकुलाचे अध्यक्ष मनीष बन्सल, राजकुमार कोळेकर, डॉ. दीपक येवले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी जठार यांनी केले, तर प्रास्ताविक शीला कोचर यांनी केले. छायाचित्रणाची जबाबदारी पद्माकर सराफ यांनी पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मधुमती शर्मा, नरेंद्र शर्मा, पांडुरंग कदरकर, वसंत महाजन, प्रा. गोरक्षनाथ गायकवाड, प्रकाश हितनाळीकर, मुकुंद मनूरकर आणि गणपती साईल यांनी परिश्रम घेतले.

“कुमार गोकर्ण याची जागतिक योगासन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड होणे ही संपूर्ण पार्क स्ट्रीटसाठी अभिमानाची बाब आहे. आम्हा ज्येष्ठांना या गुणवान बालकाचे सर्वप्रथम कौतुक करण्याची संधी मिळाली, याचे विशेष समाधान वाटते.”

– अरुण देशमुख, संपादक, ‘आठवणींचे गाठोडे’

माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाची जाणीव ठेवून पार्क स्ट्रीट ज्येष्ठ नागरिक संघाने त्यांचा जो सत्कार केला, ही उच्च दर्जाची संवेदनशीलता दर्शविणारी बाब आहे. तसेच ‘आठवणींचे गाठोडे’ ही स्मरणिका अत्यंत कल्पक आणि दर्जेदार स्वरूपात तयार करण्यात आली असून असे सुंदर काम देशमुख काकाच करू शकतात.”

– संदीप आण्णा कस्पटे, भाजपा नगरसेवक, प्रभाग क्र. २६, वाकड.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button