ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पर्यटननगरी लोणावळ्यातील पार्किंगची समस्या सुटणार!

रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार : खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती, रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक

मावळ | मावळ लोकसभा मतदारसंघातील पर्यटनगरी असलेल्या लोणावळ्यात रेल्वे प्रवाशांना वाहने लावण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. रेल्वे स्टेशन लगत जागा उपलब्ध आहे. या जागेची पाहणी करुन तेथे वाहनतळ विकसित करावे. त्यामुळे पर्यटकांना पार्किंग उपलब्ध होईल, अशी सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केली. त्यावर तत्काळ जागेची पाहणी करुन वाहनतळ विकसित करण्याची ग्वाही रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वेची चालू, प्रलंबित, प्रस्तावित कामांसदर्भात खासदार बारणे यांनी रेल्वेचे महाप्रबंधक हिरेशजी मीना यांच्याबरोबर आढावा बैठक घेतली. आमदार सुनील शेळके, अपर मंडल रेल प्रबंधक निरज यादव, मंडल वाणिज्य प्रबंध मानस पुरे, लोणावळा नगरपरिषदचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, शिवसेना शहर प्रमुख संजय भोईर, कर्जत प्रवासी संघटनेचे अध्यक्ष पंकज ओसवाल, लोणावळा नगरपरिषदचे नगरसेवक बैठकीला उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, पर्यटनगरी असलेल्या लोणावळ्यात रेल्वे प्रवाशांना वाहने लावण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. रेल्वे स्टेशन लगत जागा उपलब्ध आहे. या जागेची पाहणी करुन तेथे वाहनतळ विकसित करावे. त्यामुळे पर्यटकांना पार्किंग उपलब्ध होईल. रेल्वे अधिकाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थान परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी. लोणावळ्यात रेल्वे अंतर्गत असलेल्या २५ एकर जागेत रेल्वे म्युझिम करावे. ओव्हर ब्रीजच्या कामाला गती द्यावी. कुमार रिसॉर्टपासून रस्ता बाजारपेठेत जातो. या पुलाचे रुंदीकरण करावे. मैदान विकसित करावे.

हेही वाचा 

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे? 

स्थानिकांना भाडेतत्वार जागा उपलब्ध करून द्या

भुशी धरण परिसरात हंगामी स्वरूपाचा पर्यटन व्यवसाय करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी लावलेल्या दुकानांवर रेल्वे प्रशासनाकडूनअतिक्रमण कारवाई करण्यात आली. या परिसरामध्ये व्यवसाय करणारे स्थानिक नागरिक मागील ४० वर्षांपासून या ठिकाणी चहा, वडापाव, भजी विक्रीचा व्यवसाय करतात. केवळ व्यवसायच नाही तर भुशी धरणावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी देखील हेच व्यावसायिक घेत असतात. स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी चर्चेतून मार्ग काढावा. रेल्वेची सुरक्षा, स्थानिकांचे हित पाहून समन्वयातून चांगला प्रस्ताव आणावा. स्थानिकांना भाडेतत्वार जागा उपलब्ध करुन देण्याची सूचनाही खासदार बारणे यांनी केली. यावर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे ते लोणावळा चौथ्या ट्रॅकच्या कामाला गती द्या

पनवेल, नेरळ, कर्जत रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजनेअंतर्गत विकास करावा.पनवेल ते कर्जत रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होत आले आहे. येथील जुन्या स्टेशनपासून नवीन कॉरिडॉरला जोडणारा मार्ग तयार करावा. प्रवाशांना सुविधा द्याव्यात.
खंडाळ्यात तिकीट घर करावे. मुंबई-पुणे बंगळुरु, पुणे हैद्राबाद हाई स्पीड रेल्वे प्रकल्पाचा आराखडा तयार करावा. त्या कामाला गती द्यावी. पुणे ते लोणावळा चौथ्या ट्रॅकच्या कामाला गती द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा सुरु करा

मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्यांचे थांबे होते. कोरोना काळात हे थांबे बंद केले. त्यानंतर पुन्हा सुरु केले नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यासाठी कर्जत रेल्वे स्थानकांवर कोयना एक्सप्रेस, हैद्राबाद, चेन्नई, गढक, सिद्धेश्वर, कोल्हापूर-अहमदाबाद, बंगळुरु-जोधपूर या एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबे द्यावेत. पुणे-लोणावळा मार्गावरील दुपारी दीड वाजताची लोकल पुन्हा सुरु करावी, अशी सूचनाही खासदार बारणे यांनी केली.

मावळातील रेल्वे गेट चोवीस तास सुरु ठेवा

मावळातील डोंगरगाव येथील ३४ नंबरचे रेल्वे गेट केवळ १२ तास सुरु असते. हे गेट २४ तास सुरु ठेवावे. नाणे येथील गेट नंबर ४३ सुरु ठेवावे. कामशेत येथे आंदर मावळकडे जाणाऱ्या रस्त्यावर ओव्हर ब्रीज उभारण्यात यावा. पनवेल तालुक्यातील सोमाटणेतील गेट नंबर ७५ येथे अंडर पास तयार करण्याची सूचनाही खासदार बारणे यांनी केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button