Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिरपूर येथे शैक्षणिक व औद्योगिक उपक्रमांचे उद्घाटन

धुळे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिरपूर येथे ‘श्री विलेपार्ले केळवणी मंडळ’ संचलित विविध शैक्षणिक संस्थांसह औद्योगिक उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रकल्पांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. या प्रकल्पांमुळे शिरपूर परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील आणि परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे एस. व्ही. के. एम. कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे उद्घाटन केले. त्यांनी नव्या इमारतीची पाहणी केली. महाविद्यालयातील सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमरीशभाई पटेल, माजी आमदार कुणाल पाटील,  स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होत.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते  शिरपूर येथील कृष्णा कोटेक्स व डाय हाऊसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी,  आमदार राघवेंद्र भदाणे, आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार कुणाल पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा –  ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा देशभर जलसंवर्धनाचा नवा संदेश देईल’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कृष्णा कोटेक्सची पाहणी केली. जनक पटेल यांनी उद्योगाची माहिती दिली.

शिरपूर येथील टेक्सटाईल पार्कमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या ‘प्रथ कॉटस्पिन प्रायव्हेट लिमिटेड’ व ‘एसेरोला टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड’ या प्रकल्पांच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

कोनशिला अनावरणानंतर मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी प्रथ कॉटस्पिन टेक्टाईल पार्क आणि एसेरोला कॉटेक्स टेक्स्टाईल पार्कची पाहणी केली. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शिरपूर तालुक्यातील खर्दे येथे उभारण्यात आलेल्या श्रीमती अलका देसाई स्कुल ऑफ नर्सिंग अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button