Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमरावती लैंगिक अत्याचारप्रकरणी आणखी एक अटकेत; 20 वर्षीय हुजेर खानकडून 18 व्हिडिओ, 39 फोटो जप्त

अमरावती | अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील फोटो व व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केल्याच्या गंभीर प्रकरणात परतवाडा पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला देखील अटक केली आहे. या दोघांनी मिळून आठ अल्पवयीन मुली व महिलांचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो समाज माध्यमांवर प्रसारित केल्याचे तपासात समोर आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी प्रसार माध्यमांना दिली.

अयान अहमद तनवीर अहमद (१९, रा. परतवाडा) आणि उजेर खान इकबाल खान (२०, रा. अचलपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरात काही अल्पवयीन मुली व महिलांचे अश्लील व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

हेही वाचा     :                  सांडपाण्यामुळे पवना नदी प्रदूषित; नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका!  

परतवाडा पोलिसांच्या तपासात हे व्हिडिओ आणि फोटो अयान अहमद याच्या मोबाइलवरून प्रसारित करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अंमलदाराच्या तक्रारीवरून परतवाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला सोमवार, १३ एप्रिल रोजी रात्री अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मोबाइल जप्त करण्यात आला आहे.

मोबाइलमध्ये आढळून आलेले काही अश्लील व्हिडिओ व फोटो तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहेत. चौकशीत अयान अहमद याने काही मुलींसोबत जवळीक साधून त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे व्हिडिओ व फोटो काढले आणि ते समाज माध्यमांवर प्रसारित करून संबंधित मुलींची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, हे व्हिडिओ उजेर खान याने व्हायरल केल्याचे अयान अहमदने पोलीस कोठडीत दिलेल्या जबाबात सांगितले. त्यानुसार पोलिसांनी उजेरलाही अटक केली आहे. सायबर पोलिसांकडून समाज माध्यमांवर प्रसारित झालेले सर्व संबंधित व्हिडिओ व फोटो हटविण्याचे प्रयत्न सुरू असून ज्या खात्यांवरून ते प्रसारित करण्यात आले होते, ती खातीही बंद करण्यात आली आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button