ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

संत साई शाळेत पालक रत्न पुरस्कार सोहळा उत्साहात

शिक्षण विश्व : पालक रत्न पुरस्काराचे वितरण समारंभ

पिंपरी-चिंचवड : संत साई इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे, “पालक रत्न पुरस्काराचे वितरण समारंभ” उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट पालकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात दिलेल्या सहकार्याचा आणि योगदानाचा सन्मान करणे हे होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मान्यवर पाहुणे डॉ. अशोकजी नगरकर (निवृत्त वरिष्ठ वैज्ञानिक, DRDO, पुणे) , श्री. सचिनभैय्या लांडे (माजी युनियन लीडर, टाटा मोटर्स, सामाजिक कार्यकर्ता), तसेच शाळेचे संस्थापक व मुख्याध्यापक श्री. शिवलिंग ढवळेश्वर सर, अजित जगताप सर, शाळेच्या ट्रस्टी पायल ढवळेश्वर मॅडम, उपमुख्याध्यापिका रूपाली खोल्लम मॅडम, दुपार विभागाच्या इन्चार्ज स्वाती मोघे मॅडम, पालक शिक्षक संघांचे सदस्य उपस्थित होते.
यानंतर सर्व शिक्षकांनी एकत्रितपणे पुत्र कल्याण प्रार्थना सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. श्वेता नारायणगांवकर यांनी केले.

कार्यक्रमात पालकांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक, मान्यवर पाहुणे आणि शिक्षकांच्या हस्ते पालक व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप असे होते, Nursery,L.KG,U.KG च्या पालकांना ‘Nurturing Parents’, 1st to 4th च्या पालकांना ‘Supportive Parents’ ,5th to 7th च्या पालकांना ‘Committed parents, 8th आणि 9th च्या पालकांना Devoted Parents या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी शाळेच्या उपक्रमांबद्दल आणि संस्कारांबद्दल माहिती देण्यात आली.मुख्याध्यापकांच्या भाषणात त्यांनी पालक आणि शाळा यांच्यातील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग, प्राणायाम आणि जीवनमूल्य शिक्षणाची गरज त्यांनी सांगितली.

हेही वाचा –  ६,०४५ रिक्त जागांसाठी १८ एप्रिल २०२६ रोजी पीसीसीओई निगडी इथे भव्य रोजगार मेळावा

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज वाबळे सर, रिया पोतदार मॅडम, मालन लिगाडे मॅडम, सुहासिनी बदोले मॅडम, कोमल वाबळे मॅडम, संजय अनार्थे सर, अक्षय राणे सर ,प्रमोद शिंदे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमामुळे पालक व शाळा यांच्यातील नाते अधिक दृढ झाले.

कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रकल्याण प्रार्थना आणि सौ. श्वेता नारायणगांवकर यांनी दिलेल्या आभार प्रदर्शनाने झाला.

पुरस्कारामुळे अनेक पालकांना प्रेरणा…

श्री. सचिनभैय्या लांडगे यांनी या पुरस्कारामुळे अनेक पालकांना प्रेरणा मिळेल असे सांगितले . पुढे त्यांनी आपल्या भाषणात संस्कृती, साजरे होणारे सण-उत्सव (जसे मातृ-पितृ दिन, रक्षाबंधन) आणि मूल्याधारित शिक्षण यावर भर दिला. डॉ. अशोकजी नागरकर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी डॉ. होमी भाभा यांच्यासारख्या महान शास्त्रज्ञांचे उदाहरण देत विद्यार्थ्यांना प्रकल्प आणि उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.डॉ. अजित जगताप सर यांनी पालकांना आपली संस्कृती जपण्यासोबत आपल्या पाल्याच्या वेशभूषाची विशेष काळजी घेण्याचे आव्हान केले. तसेच काही पालकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यामध्ये सौ. रश्मिका पाटील, श्री. आनंद कुंभार, श्री. संदीप शिंदे, श्री. विलास साबळे आणि श्री. प्रशांत देशमुख यांनी आपले अनुभव मांडले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button