६,०४५ रिक्त जागांसाठी १८ एप्रिल २०२६ रोजी पीसीसीओई निगडी इथे भव्य रोजगार मेळावा
शिक्षण विश्व: पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात “PCCOE जॉब फेअर 2026” चे आयोजन

पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग (पीसीसीओई), निगडी, पुणे येथे शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता “पीसीसीओई जॉब फेअर – २०२६” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम भारत सरकारच्या बोर्ड ऑफ अँप्रेन्टीसशिप ट्रेनिंग (BOAT), महाराष्ट्र असोसिएशन ऑफ टीपीओ (MaTPO),आणि ऑल इंडिया टीपीओ असोसिएशन (AITPO) यांच्या सहकार्याने राबविण्यात येत असून, विद्यार्थ्यांसाठी नोकरी, अप्रेंटिसशिप आणि इंटर्नशिपच्या मोठ्या संधी उपलब्ध असणार आहेत अशी माहिती पीसीईटी सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता व महाराष्ट्र असोसिएशन ऑफ टीपीओ आणि ऑल इंडिया टीपीओ असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी दिली.
या जॉब फेअरमध्ये डिप्लोमा, बीई/बीटेक,बीएससी, बीसीएस, बीसीए, बीए, बीकॉम, बीबीए, बीफार्म, एमबीए, आयटीआय तसेच इतर विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना सहभागाची संधी मिळणार आहे. २०२६ बॅचचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी, २०२७ बॅचचे प्री-फायनल वर्षातील विद्यार्थी तसेच जून/जुलै २०२५, २०२४, २०२३, २०२२ आणि २०२१ मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील या जॉब फेअरसाठी पात्र असतील. उमेदवारांना नोकरी, अप्रेंटिसशिपच्या व इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या जॉब फेअरच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार श्री. ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव श्री. विठ्ठल काळभोर, खजिनदार श्री. शांताराम गराडे, ट्रस्टी श्री. हर्षवर्धन पाटील, युवा उद्योजक श्री. नरेंद्र लांडगे, युवा उद्योजक श्री. अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी तसेच बोट चे संचालक श्री. पी. एन. जुमले, उपसंचालक श्री. एन. एन. वडोदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
हेही वाचा – “मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा हरपला”; आशाताईंच्या निधनावर मुख्यमंत्री फडणविसांकडून दु:ख व्यक्त

विविध कंपन्यांचा सहभाग…
या जॉब फेअरमध्ये नामांकित अशा कंपन्यांचा सहभाग असणार आहे. त्यामध्ये कमिन्स इंडिया (Cummins India), जॉन डिअर इंडिया (John Deere India), दाना इंडिया (Dana India), पियाजिओ व्हेईकल्स (Piaggio Vehicles), प्रीमियम ट्रान्समिशन (Premium Transmission), फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स (Flash Electronics), सँडविक (Sandvik), फियाट इंडिया (FIAT India) यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांसह सुमारे १०० कंपन्या सहभागी होणार आहेत.
आतापर्यंत सुमारे 70 कंपन्यांनी या जॉब फेअर साठी रेजिस्ट्रेशन केले आहे व त्यामध्ये सुमारे ६,०४५ रिक्त पदे उपलब्ध असणार आहेत. या जॉब फेअर मध्ये डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी सुमारे ४,३०० रिक्त पदे आहेत. तसेच इतर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरी, अप्रेंटिसशिप व इंटर्नशिपसाठी सुमारे १,७४५ रिक्त पदे उपलब्ध असणार आहेत.
या जॉब फेअरच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी खालील लिंकवर नोंदणी करावी :
https://tinyurl.com/JOBFAIR2026StudentRegistration या जॉब फेअरच्या यशस्वी आयोजनासाठी सेंट्रल प्लेसमेंट सेलतर्फे डॉ. शितलकुमार रवंदळे, प्रा. संदीप पिल्लेवार, प्रा. ऋषिकेश पांडे, प्रा. विजय टोपे, प्रा. दीपक वाघ, प्रा. हीना शर्मा, प्रा. डेन्झेटा लोबो, प्रा. पायल काळे, श्री. मंगेश काळभोर यांच्यासह २०० हून अधिक विद्यार्थी प्रतिनिधी सक्रियपणे परिश्रम घेत आहेत.





