Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला! MPSC मार्फत भरती प्रक्रिया जलदगतीने घेण्याबाबत मोठा निर्णय; सोमवारी महत्त्वाची बैठक…

नागपूर  :  महाराष्ट्रात २०२६ मध्ये ७०,००० हून अधिक सरकारी पदांची मेगा भरती होणार असून, यामध्ये पोलीस, तलाठी, आणि शिक्षकांसह इतर अनेक विभागांतील रिक्त पदे भरली जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले असून, २०,००० पदे एमपीएससीद्वारे भरली जातील. मात्र भरती प्रक्रिया राबवण्यास अनेकदा अडचणी येतात तसेच राज्य सरकारच्या विविध विभागाकडून मागणी पत्र देण्यामध्येही प्रचंड विलंब होतो. त्यामुळे राज्य सरकारने एमपीएससीची भरती प्रक्रिया जलद गतीने घेण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) बळकट करण्याचे आश्वासन दिले खरे परंतु, सातत्याने रखडत चाललेले निकाल, परीक्षा, निवड प्रक्रिया आणि आरक्षणाच्या गोंधळामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षार्थी चिंताग्रस्त झाला आहे. मात्र, आयोगाने यावर उपाय शोधला आहे. सरकारने तीन सदस्यांची नियुक्ती केली असून यामुळे एमपीएससी बळकट होणार आहे. तसेच निकाल आणि नियुक्तीच्या प्रक्रियेला गती येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. राजीव निवतकर, दिलीप भुजबळ आणि महेंद्र वारभुवन यांची नियुक्ती केली होती.

हेही वाचा –  R Ashwin Advice To Rishabh Pant : पंतला हात जोडून विनंती करतोय; संघासाठी अन् स्वतःसाठीही… आर. अश्विन कोणता सल्ला देतोय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून राज्यसेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना न्याय देण्यासाठी ‘एमपीएससी’च्या तीन रिक्त सदस्यपदांवरील नियुक्ती तातडीने करण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून करण्यात आली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीला बळकट करण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आता भरती प्रक्रियेला जलद गती देण्यासाठी महत्त्वाचे बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये मागणी पत्र तात्काळ कसे पाठवता येतील आणि भरती प्रक्रिया जलद गतीने कशी पार पाडता येईल या संदर्भात चर्चा होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षांसाठी मागणीपत्र पाठविण्याबाबत कार्यवाही प्रशासकीय विभागांमार्फत केली जाते. तथापि विभागांमध्ये रिक्त असलेल्या पदांसाठीचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे विहित मुदतीत सादर न केल्यामुळे सदर पदांसाठी निवडप्रकीया राबविण्याबाबतची पुढील कार्यवाही दीर्घकाळ प्रलंबित राहाते. सबब, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविण्यात येणाऱ्या मागणीपत्रांची प्रक्रिया जलदगतीने होण्याच्या अनुषंगाने रिक्त पदांचा आढावा घेण्यासाठी मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०६.०४.२०२६ रोजी दु.२.३० वाजता मा. मुख्य सचिव यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली आहे. आपल्या अधिपत्याखालील सर्व संवर्गाच्या रिक्त पदांची तसेच बिंदुनामावलीची सद्यस्थिती व त्याअनुषंगीक माहितीसह बैठकीस उपस्थित रहावे, ही विनंती.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button