Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नाशिकफाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदा प्रक्रियेला गती

भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश

देशातील नामांकित कंपन्यांकडून निविदा दाखल

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड ते राजगुरूनगर खेड दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक, कामगार आणि उद्योजक त्रस्त असलेल्या भीषण वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी नियोजित नाशिक फाटा ते खेड या ३० किमी लांबीच्या ८ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. मार्च २०२६ मध्ये या प्रकल्पासाठी तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या असून, या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला आता गती मिळाली आहे.

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मार्फत राबवण्यात येत असून, यासाठी सुमारे ७ हजार ८२७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तांत्रिक निविदा प्रक्रियेत अदानी इंटरप्राईजेस लि., जीआर इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि. आणि प्रकाश एसफालटिंग अँड टोल हायवेज इंडिया लि. यांसारख्या देशातील आघाडीच्या पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या दर्जाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

आमदार महेश लांडगे यांचा सकारात्मक पाठपुरावा…

भाजपाचे नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. विशेषतः भोसरी ते मोशी इंद्रायणी नदी दरम्यानच्या भू-संपादनातील अडचणी, एफएसआय/टीडीआरच्या माध्यमातून जमीन उपलब्ध करून देण्यातील अडथळे, तसेच निधीबाबतचे प्रश्न त्यांनी वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास आणले.

हेही वाचा       :              Inside Story: शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे आग्रह करीत असलेल्या ठेकेदाराकडून ९५ लाखांचा अपहार!

प्रकल्पाची वैशिष्ट्ये…

या प्रकल्पांतर्गत सिंगल पिलरवर उभारण्यात येणारा ८ पदरी एलिव्हेटेड फ्लायओव्हर, विद्यमान महामार्गाचे ४/६ पदरी रुंदीकरण, एकूण 30 किमी लांबी, तसेच स्वतंत्र सर्व्हिस रोडची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक वाहतूक आणि लांब पल्ल्याच्या वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण होणार आहे.

उद्योजक व नागरिकांना मोठा दिलासा…

हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड, भोसरी आणि चाकणसारख्या प्रमुख औद्योगिक केंद्रांना खेडमार्गे वेगवान व सुरक्षित कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. सध्या पुणे–नाशिक महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी, अपघात आणि वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.

“नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर हा पिंपरी-चिंचवड, भोसरी, मोशी, चाकण आणि खेड परिसरातील लाखो नागरिक, कामगार आणि उद्योजकांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून त्याच्या निविदा प्रक्रियेला मिळालेली गती समाधानकारक आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वात आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याबाबत आम्ही सर्वतोपरी पाठपुरावा करणार आहोत.”

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button