शेतकऱ्यांना दिलासा! नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8 वा हप्ता लवकरच जमा होणार

Namo Shetkari Yojana 8th Installment : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8 वा हप्ता पुढील आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
या हप्त्यासाठी सरकारने 1,774 कोटींचा निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. राज्यातील पात्र 90 लाख 34 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8 व्या हप्त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद विशेष लक्ष घालून उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे.
हेही वाचा – जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्येही आता स्वीकृत सदस्य !विधेयक सर्वानुमते मंजूर
पीएम किसान योजनेप्रमाणेच ही योजना राबविली जाते. पीएम किसान योजनेतून दरवर्षी 6 हजार रुपये देण्यात येते तर राज्य शासनाकडून 6,000 रुपये अनुदान दिले जाते.
या योजनेमुळे आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी एकूण 12 हजार रुपये जमा होतात. या योजनेसाठी सरकारने 1,774 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर प्रत्यक्षात 1820 कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देऊन शेतीचा वाढता खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा मुख्य उद्देश आहे.
दरम्यान, केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता दिनांक 13 मार्च 2026 रोजी वितरीत केल्यानंतर राज्य शासना नेहीनमो योजनेचा आठवा हप्ता वितरीत करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण केली आहे.





