Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्येही आता स्वीकृत सदस्य !विधेयक सर्वानुमते मंजूर

मुंबई : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) विधेयक २०२६ विधानसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी हे विधेयक मांडले. पालिका, नगरपालिका प्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये स्थानिक पातळीवरील कला, संस्कृती क्षेत्रातील तज्ञ स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त केले जाणार आहेत. जिल्हा परिषदे मध्ये ही संख्या एकूण सदस्यांच्या २० टक्के तर पंचायत समितीमध्ये १० टक्के स्वीकृत सदस्यांना स्थान मिळणार आहे.

हेही वाचा –  RCB Sale IPL: कोण खरेदी करणार RCB? दोन कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा; किती कोटींना होणार डील?

ग्रामीण भागातील तज्ञ नागरीकांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्थान मिळावे यासाठी हे विधेयक सरकारने सभागृहाच्या मंजूरीसाठी सादर केले असल्याचे गोरे यांनी सांगितले. नाना पटोले. विक्रम पाचपुते, प्रवीण स्वामी, प्रतापराव चिखलीकर, सुहास बाबर, राजकुमार बडोले, चंद्रदीप नरके, बाबासाहेब देशमुख, विठ्ठल लंघे, हरिष पिंपळे या सदस्यांनी या विधेयकाचे स्वागत केले. विरोधी पक्षातील सदस्यांनी या विधेेयकाला एकमताने पाठिंबा दिला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button