ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशी–चिखली परिसरात 11 ठिकाणी ‘‘नो पार्किंग झोन’’

भाजपा नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांचा पाठपुरावा

वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुढाकार

पिंपरी-चिंचवड । प्रतिक्रिया

मोशी–चिखली परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांची मालिका रोखण्यासाठी भाजपा नगरसेवक नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. त्यांच्या पुढाकारामुळे पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने परिसरातील ११ प्रमुख सिग्नल चौकांपासून १०० मीटरपर्यंतचा परिसर ‘नो-पार्किंग झोन’ म्हणून घोषित केला आहे. तसेच ३१ मीटर रस्त्यावरही वाहन पार्किंगला बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी या मुद्यावर पाठपुरावा केला. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे होणारे हाल आणि वारंवार घडणारे अपघात लक्षात घेऊन बोऱ्हाडे यांनी २५ फेब्रुवारी रोजी पोलीस उपायुक्तांकडे ठोस उपाययोजनांची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत प्रशासनाने अवघ्या १५ दिवसांत अधिकृत अधिसूचना काढत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

परिसरातील नागरिकांकडून वाढत्या वाहतूक समस्येबाबत वारंवार तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर बोऱ्हाडे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे वाहतूक विभागाने तातडीने पावले उचलत ‘नो-पार्किंग’चा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा        :          शिवछत्रपती लिनिअर गार्डनच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार!

.. या चौकांमध्ये ‘नो-पार्किंग’ची अंमलबजावणी

वाहतूक व्यवस्थापनासाठी लक्ष्मी चौक, कोर्ट चौक, जय भारत चौक, श्रीराम चौक, जाधव सरकार चौक, गोल्ड जिम चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मोशी चौक, भारतमाता चौक, क्रांती चौक आणि बोऱ्हाडेवाडी चौक या महत्त्वाच्या चौकांपासून १०० मीटरपर्यंत वाहन उभे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे रस्त्यांवरील अडथळे कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे.

नागरिकांना दिलेला शब्द पाळला

केवळ समस्या मांडण्यापेक्षा त्यावर ठोस उपाययोजना करून प्रशासनाकडून अधिकृत आदेश काढून घेण्याची कार्यपद्धती ही बोऱ्हाडे यांच्या कामाची वैशिष्ट्ये मानली जात आहेत. त्यांच्या या पुढाकारामुळे मोशी–चिखली परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. निखिल बोऱ्हाडे यांच्या या प्रयत्नांचे शहरभर कौतुक होत असून, नागरिकांना दिलेला शब्द पाळत त्यांनी जनसेवेचा आदर्श निर्माण केल्याची भावना परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

“मोशी–चिखली परिसरातील वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी मोठी समस्या बनली होती. वारंवार होणारे अपघात आणि कोंडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवणे गरजेचे होते. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत मी वाहतूक विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यातूनच या ११ महत्त्वाच्या चौकांमध्ये ‘नो-पार्किंग’चा निर्णय झाला आहे. हा निर्णय केवळ सुरुवात आहे. पुढेही परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुटसुटीत आणि सुरक्षित करण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधून आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविणार आहे. नागरिकांना सुरक्षित, सुरळीत आणि जलद प्रवास मिळावा, हीच आमची प्राथमिकता आहे.”

– निखिल बोऱ्हाडे, नगरसेवक, भाजपा, मोशी- बोऱ्हाडेवाडी.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button