Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

इराकमध्ये अमेरिकेचे KC-135 रिफ्यूलिंग लष्करी विमान कोसळले, विमानात ५ जणांचा समावेश

US Military Plane Crash | इराणविरोधात सुरू असलेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या हवाई दलाचे KC-135 स्ट्रॅटो टँकर हे हवेत इंधन भरणारे विमान इराकमध्ये कोसळल्याची माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिली आहे. या विमानात एकूण पाच क्रू सदस्य होते. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

अमेरिकन लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, दोन विमान हवेत असताना इंधन भरण्याची प्रक्रिया सुरू होती, त्यावेळी ही दुर्घटना घडली. या घटनेत दुसऱ्या विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले, तर KC-135 विमान कोसळले.

शत्रूच्या हल्ल्याची शक्यता नाकारली

अमेरिकन लष्कराने प्राथमिक माहितीनुसार शत्रू राष्ट्राच्या हल्ल्यामुळे अपघात झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू आहे. अपघातग्रस्त विमानातील क्रू सदस्यांच्या स्थितीबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

यूएस सेंट्रल कमांडने एक्स (X) वरील पोस्टमध्ये सांगितले की, इराणविरोधात ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ सुरू असताना मित्र राष्ट्राच्या हवाई क्षेत्रात ही दुर्घटना घडली. अपघातानंतर तातडीने शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा       :              रत्नागिरी जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का; रिश्टर स्केलवर तीव्रता २.८

KC-135 विमानाची युद्धातील महत्त्वाची भूमिका

KC-135 हे अमेरिकन वायुदलाचे अत्यंत महत्त्वाचे एरियल रिफ्यूलिंग (हवेत इंधन भरणारे) विमान आहे. हे विमान लढाऊ विमानांना हवेतच इंधन पुरवते, त्यामुळे ती विमाने लांब पल्ल्याच्या मोहिमा अधिक काळ सुरू ठेवू शकतात. विशेषतः पश्चिम आशियातील मोठ्या भौगोलिक क्षेत्रात चालणाऱ्या लष्करी कारवायांमध्ये अशा विमानांची मोठी भूमिका असते.

बंडखोर गटाचा दावा

इराकशी संबंधित ‘इस्लामिक रेसिस्टन्स’ या सशस्त्र संघटनेने अमेरिकेचे KC-135 विमान पाडल्याचा दावा केला आहे. संघटनेने म्हटले की, देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि हवाई क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेसच्या माहितीनुसार, इराणविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान कोसळलेले हे अमेरिकेचे चौथे विमान असल्याचे सांगितले जात आहे. मागील आठवड्यात कुवेती सैन्याच्या गोळीबारात चुकून तीन अमेरिकन लढाऊ विमाने पाडली गेल्याची माहिती अमेरिकन सैन्याने दिली होती.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button