Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

संत साई इंग्लिश मिडियम स्कूल येथे जागतिक महिला दिन मोठया उत्साहात साजरा

​ पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) :

दिनांक ७ मार्च २०२६ रोजी संत साई शाळेच्या प्रांगणात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका श्वेता नारायणगावकर यांनी केले. यात त्यांनी महिला दिनाचे महत्त्व, तो का साजरा केला जातो हे सांगितले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेची माजी विद्यार्थिनी डॉक्टर साक्षी बोचरे – एस. एस. सी बॅच २०१५ (एम.बी.बी.एस) हिला बोलवण्यात  आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर साक्षी बोचरे हिचा परिचय करून देण्यात आला. तसेच मुख्याध्यापक श्री. ढवळेश्वर सर यांनी तिचा सत्कार केला.यानंतर शाळेचे चित्रकला शिक्षक संजय अनार्थे सर यांनी आपल्या भाषणातून स्त्रीतत्त्वाची माहिती दिली.

हेही वाचा –  ‘भांडवली बाजारातील ‘बॉण्ड’च्या माध्यमातून शहरांच्या विकासाला निधीचे बळ’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भंडारकवठे विकास मंच आणि गुरु फॉर लाईफ फाउंडेशन, जुळे सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या गौरवार्थ ‘समाज भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रतिष्ठित सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान व सातत्यपूर्ण कार्याबद्दल संत साई हायस्कूलच्या संस्थापिका व मुख्याध्यापिका सौ. सुनीता ढवळेश्वर मॅडम यांना ‘समाज भूषण’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले त्यानिमित्य त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सौ स्वाती मोघे मॅडम यांनी ढवळेश्वर मॅडम यांचा परिचय करून दिला त्यांचे शिक्षण त्यांचे कार्य याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री. शिवलिंग ढवळेश्वर सर यांनी आपल्या भाषणात स्त्रियांचा सन्मान राखणे आणि त्यांना समान संधी देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे सांगितले.

यानंतर शिक्षिका पूजा पावटेकर, रिया पोतदार ,मालन लिगाडे, कोमल वाबळे, सुहासिनी बदोले यांनी महिला शिक्षकांसाठी काही खेळ घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज वाबळे सर, भारती ढवळेश्वर मॅडम यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी सौ. पूजा गव्हाणे, सौ. सुवर्णा खोंडे, सौ. पूजा गव्हाणे, सौ. मीरा शर्मा, सौ. पल्लवी भिसे उपस्थित होते.
अशाप्रकारे उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रमोद अनिल शिंदे
शिक्षक प्रतिनिधी
संत साई स्कूल, भोसरी.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button