Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मुंबई- बंगळूर महामार्गावर मोटार जळून खाक

पिंपरी  ( महा ई न्यूज ) –  मुंबई – बंगळूर महामार्गावर चालत्या मोटारीने अचानक पेट घेतल्याने जळून खाक झाली. ही घटना आज पहाटे तीनच्या सुमारास महामार्गावर सुस पाषाण पुलाजवळ घडली.

किरण लक्ष्मण जांभळे (वय २५, रा. महादेवनगर दिघी) असे वाहनचालकाचे नाव असून ते पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होते. चालू गाडीत अचानक फटाका फुटल्यासारखा आवाज झाला व धुर येऊ लागल्याचे लक्षात येताच चालकाने वेळीच गाडी बाजूला घेतल्याने मोठा अनर्थ टळला.मात्र, या आगीत इंडिका मोटार (एमएच. २४. एयु. ०८२०) पूर्णपणे जळून खाक झाली आहे. हिंजवडी पोलीस पुढील घटनेचा तपास करत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button