Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

PCMC : सस्पेन्स कायम..! स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार?

उत्सुकता शिगेला : सत्ताधारी भाजपाने ‘‘पॉलिटिकल बॅलन्स’’ धोरण

पिंपरी | महापालिकेतील सत्तावाटप जवळपास स्पष्ट झाले असले, तरी स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत सस्पेन्स कायम आहे. सत्तारूढ पक्षनेत्याची जबाबदारी प्रशांत शितोळे यांच्याकडे सोपविली असून, ते चिंचवड विधानसभा मतदारसंघातून येतात.

महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले रवी लांडगे हे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेल्या शर्मिला बाबर या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून येतात. त्यामुळे भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या तीनही विधानसभा मतदारसंघांना प्रत्येकी एक महत्त्वाचे पद दिल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

हेही वाचा     :            ‘काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक 

या पार्श्वभूमीवर आता महापालिकेतील सर्वाधिक महत्त्वाची समजली जाणारी स्थायी समितीचे अध्यक्षपद कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आर्थिक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या पदासाठी कोणाची निवड होते, यावर आगामी काळातील विकासकामांची दिशा ठरणार असल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

तीनही मतदारसंघांचा समतोल साधण्याचा प्रयत्न झाल्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्षपद चौथ्या नेतृत्वाला दिले जाणार की, याच तिन्ही मतदारसंघांपैकी एखाद्यालाच पुन्हा एक अतिरिक्त जबाबदारी दिली जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा पुढील निर्णय कोणता असेल, याकडे महापालिकेतील सर्वांची नजर लागली आहे.

मला कोणतेही पद नको : नगरसवेक शीतल शिंदे

महापौर आणि उपमहापौर उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृत पत्राद्वारे उपमहापौरपदासाठी नाव जाहीर करूनही विजय उर्फ शीतल गोरख शिंदे यांनी हे पद स्वीकारण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. ‘मला कोणतेही पद नको. मी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करेन,’ अशी भूमिका घेत ते महापालिकेतून बाहेर पडले. यामुळे भाजपच्या शहर संघटनेत अस्वस्थता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button