breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सोलापूर ‘महापौरांच्या पतीसह चौघांनी घातले विष’; भाजप नगरसेवकांचा गंभीर आरोप

सोलापूर – सोलापूर महापालिकेच्या महापौर शोभा बनशेट्टी यांचे पती श्रीशैल बनशेट्टी, भाजप शहराध्यक्ष प्रा.अशोक निंबर्गी, राज्य शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर आणि नगरसेवक सुनील कामाठी यांनी आपल्याला विष घातले, असा खळबळजनक आरोप महापालिकेतील भाजपचे माजी सभागृहनेते अन नगरसेवक सुरेश पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. पाटील यांनी मागितलेल्या वेळेनंतर संशयितांची नावे बंद लिफाफ्यातून दिली आहेत. सुरू असलेला तपास आणि मिळालेली नावे याचा अहवाल तयार करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती जोडभावीपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यशवंत केडगे यांनी दिली आहे.

थेलियम विषबाधा प्रकरणी सुरेश पाटील यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट केला. जबाब देऊनही आपली फिर्याद का दाखल करुन घेतली जात नाही, असा सवाल पाटील यांनी विचारला आहे.  ६ डिसेंबर २०१७ रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने पाटील यांना उपचारासाठी मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे व नंतर मुंबईला हलविले होते.

मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान पाटील यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे उघड झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाटील यांचे चिरंजीव बिपीन पाटील यांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक चौकशीसाठी हे प्रकरण सीआयडीकडे दिल्याची घोषणा केली होती. पण ९ महिन्यांत सीआयडीची चौकशी रखडली. त्यामुळे सभागृहनेते संजय कोळी यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

अठरा दिवसांपूर्वी सर्वपक्षीय मोर्चा निघाल्यानंतर शहर पोलिसांनी सुरेश पाटील यांच्याकडे जावून या प्रकरणाची माहिती घेतली होती. शनिवारी रात्री संशयित असलेल्या लोकांची नावे पाटील यांनी आपल्या जबाबात जोडभावीपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक केडगे यांना दिली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button