ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

बॉलिवूडचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट

45 कोटी बजेट अन् कमाई फक्त 60 हजार रुपये

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, जे प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात. मात्र, यामध्ये असे देखील काही चित्रपट आहेत, जे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले पण त्यांना अपेक्षित यश प्राप्त करता आलं नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याने बॉक्स ऑफिसवर सर्वात कमी कमाई केली. हा चित्रपट त्या अभिनेताचा सर्वात फ्लॉप चित्रपट आहे. कोणता आहे तो चित्रपट? जाणून घ्या सविस्तर

बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक मोठ्या बजेटचे चित्रपट प्रदर्शित होतात. काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रम करतात तर काही अपेक्षांच्या अगदी विरुद्ध जाऊन प्रचंड अपयशी ठरतात. मात्र, 2023 साली प्रदर्शित झालेल्या ‘द लेडी किलर’ या चित्रपटाने अपयशाचा असा विक्रम केला की तो आज भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठ्या फ्लॉप चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो.

हेही वाचा      :            ‘ट्रान्सेंड गोवा 2026’चे उद्घाटन; उदयोन्मुख सर्जनशील अर्थव्यवस्थेवर भर 

अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांचा मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट तब्बल 45 कोटी रुपयांमध्ये तयार करण्यात आला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फक्त 60 हजार रुपये इतकीच कमाई केली. म्हणजेच निर्मात्यांना चित्रपटाच्या बजेटच्या केवळ 0.0001 टक्के इतकीच कमाई केली.

चित्रपट रिलीज झालेलाच लोकांना माहिती नाही

‘द लेडी किलर’ हा क्राईम थ्रिलर प्रकारातील चित्रपट होता. मात्र, तो नेमका कधी प्रदर्शित झाला आणि कधी थिएटरमधून उतरला याची साधी माहिती देखील प्रेक्षकांना झाली नाही. पहिल्या दिवशी या चित्रपटाचे फक्त 293 तिकीट विकले गेली. पुढील काही दिवसांत हा आकडा कसाबसा 500 तिकीटांपर्यंत पोहोचला, पण त्यानंतर चित्रपट थेट थिएटरमधून काढून टाकण्यात आला.

सुपरस्टार असूनही फ्लॉप ठरला

चित्रपटाचा नायक अर्जुन कपूर हा एका प्रसिद्ध निर्माता कुटुंबातील सदस्य आहे तर भूमी पेडणेकर ही राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री आहे. इतके मोठे स्टार्स असूनही केवळ नावाच्या जोरावर चित्रपट चालत नाही हे ‘द लेडी किलर’ चित्रपटाने पुन्हा एकदा सिद्ध केलं. सर्वात कमी कमाई, कमी तिकीट विक्री आणि प्रचंड बजेट यामुळे ‘द लेडी किलर’ हा चित्रपट आज भारताच्या चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात मोठा बॉक्स ऑफिस फ्लॉप चित्रपट मानला जातो.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button