Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

अजितदादांना धक्का! पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाने गड राखला

पुणे | राज्यातील २९ महानगरपालिकांचे निकाल आज जाहीर होत असून, मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये भाजप-शिवसेना (शिंदे) आघाडीने आघाडी घेतली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती केली होती. प्रचारादरम्यान पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. मात्र हे आरोप मतपेटीत अपेक्षित परिणाम साधू शकले नसल्याचे चित्र निकालांतून स्पष्ट झाले आहे.

१६५ नगरसेवक असलेल्या पुणे महानगरपालिकेत भाजपाने सर्वाधिक जागांवर आघाडी घेतली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नाही. त्यामुळे पुण्यात एकत्र येऊनही ‘घड्याळ’ आणि ‘तुतारी’ या चिन्हांना मतदारांनी नकार दिल्याचे दिसून येते.

हेही वाचा     :          पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत ५७.७१ टक्के मतदान

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतही अशीच स्थिती आहे. १२८ नगरसेवक असलेल्या या महापालिकेत भाजपाने बहुमतापेक्षाही अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काही जागा मिळाल्या असल्या तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला येथे फारशी चमक दाखवता आलेली नाही. एकूणच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाने आपला गड कायम राखल्याचे या निकालांतून स्पष्ट झाले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका : कोण आघाडीवर?

एकूण जागा – 128

भाजप – 84

शिवसेना – 7

राष्ट्रवादी – 35

काँग्रेस – 00

शिवसेना (उद्धव ठाकरे) – 00

राष्ट्रवादी (शरद पवार) – 01

महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 00

इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) – 01

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button