पिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदागर-रहाटणी प्रभाग 28 मध्ये भाजपाची उद्या प्रचार पदयात्रा

मिशन – PCMC : भाजपाचे शत्रुघ्न काटे यांच्या पॅनेलची प्रचारात आघाडी

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचार मोहिमेचा उद्या भव्य प्रारंभ होणार आहे. भाजपाचे शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल या पदयात्रेत आघाडी घेत आहे, तर त्यांच्या पॅनेलमध्ये काटे अनिता संदीप (सर्वसाधारण – महिला), भिसे कुंदा संजय (सर्वसाधारण – महिला) आणि काटे संदेश रामचंद्र (सर्वसाधारण) यांचा समावेश आहे.

पदयात्रा सकाळी ९:०० वाजता पिंपळे सौदागर येथून सुरू होईल. याचा मार्ग स्वराज गार्डन चौक, सेव्हन स्टार लेन, गोविंद गार्डन रोड, कुणाल आयकॉन रोड, शिवार चौक, कोकणे चौक, रहाटणी चौक पार करून विमल गार्डन चौक येथे संपेल. पक्षाने सांगितले की, पदयात्रेदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधून, स्थानिक समस्या आणि प्रभागातील विकास विषयक मुद्दे मांडले जातील.

हेही वाचा –  शेतकऱ्यांसाठी खूषखबर…! पीएम किसानचा २२ वा हप्ता लवकरच मिळणार…

भाजपकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, ‘कमळ’ चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. मतदान गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत होणार आहे.

पक्षाचे स्थानिक नेते म्हणाले की, पदयात्रा ही फक्त प्रचाराची मोहीम नाही, तर प्रभागातील लोकांचा सहभाग वाढवण्याचा आणि विकासाचे मुद्दे जनतेसमोर आणण्याचा मार्ग आहे. त्यांनी नागरिकांना सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले असून, पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याचे सांगितले. भाजपच्या या मोहिमेमुळे प्रभागातील वातावरण उत्साही आणि जोमाने भरलेले असून, पक्षाचे उमेदवार प्रभागातील प्रत्येक घरपोच पोहोचून जनतेशी संवाद साधत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“प्रत्येक नागरिकाचा आवाज ऐकणे आणि प्रभागातील विकासाला गती देणे हा माझा प्रमुख उद्देश आहे. आपण एकत्र आहोत, तर बदल शक्य आहे. ‘कमळ’ चिन्हावर मतदान करून आपली साथ द्या, आपण एकत्र प्रभागाला नवी उंचीवर घेऊन जाऊ!”

— शत्रुघ्न सिताराम काटे, उमेदवार, भाजपा, प्रभाग- 28.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button