प्रभाग क्रमांक ४ दिघी-बोपखेलमध्ये भाजप उमेदवारांचा जोरदार प्रचार
मिशन- PCMC : विकासाच्या मुद्यावर मतदारांना आवाहन

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ (दिघी–बोपखेल) येथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ जोरदार प्रचार मोहिम पार पडली. या प्रचारात सुमारे ३०० कार्यकर्ते, पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपचे अधिकृत उमेदवार श्रुती विकास डोळस, कृष्णा भिकाजी सुरकुले, हिरानानी गोवर्धन घुले आणि उदय दत्तात्रय गायकवाड यांच्या समर्थनार्थ हा प्रचार राबविण्यात आला. प्रचाराची सुरुवात गणेशनगर कॉलनी क्रमांक १६ व १७ आणि हरी ओम ज्येष्ठ नागरिक संघ, बोपखेल येथून करण्यात आली. उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह परिसरात फेरफटका मारून घराघरांत जाऊन थेट मतदारांशी संवाद साधला. नागरिकांच्या समस्या ऐकल्या, परिसरातील विकासकामांची माहिती दिली तसेच भविष्यातील योजनांबाबत मार्गदर्शन केले.
हेही वाचा – ‘भाजपची विचारधारा मुस्लिमविरोधी नाही; दहशतवादाच्या विरोधात आहोत’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयीसुविधा यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली. उमेदवारांनी निवडणुकीत यश मिळाल्यास प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले.
हरी ओम ज्येष्ठ नागरिक संघाच्या संवादात ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षितता, आरोग्य सुविधा आणि सामाजिक उपक्रमांसाठी आवश्यक पाठबळ देण्याचे अपेक्षांचे मुद्दे मांडले. यावर उमेदवारांनी त्यांना पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट पहायला मिळाली. भाजप उमेदवारांना बोपखेल परिसरातून वाढत चाललेला प्रतिसाद पाहून कार्यकर्त्यांनी निवडणुकीत मोठ्या जनसमर्थनाची अपेक्षा व्यक्त केली.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“प्रभाग क्रमांक ४ च्या प्रत्येक नागरिकाच्या गरजा आमच्यासाठी प्राधान्य आहेत. निवडून आल्यास आम्ही बोपखेल परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार आहोत आणि पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयीसुविधा सुनिश्चित करू.
– उदय दत्तात्रय गायकवाड, उमेदवार, भाजपा, प्रभाग- 4.




