Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

एमपीएससीचा मोठा निर्णय! वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मिळणार ‘एक वर्ष’ वाढवून

Share On

पुणे :  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील हजारो तरुणांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. शासकीय सेवा परीक्षांसाठी कमाल वयोमर्यादेत एका वर्षाची शिथिलता देण्याचा निर्णय आयोगाने जाहीर केला आहे. यामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या पात्र उमेदवारांना पुन्हा एकदा परीक्षेच्या प्रवाहात येण्याची संधी मिळाली आहे.

प्रामुख्याने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी हा निर्णय लागू होणार आहे.राज्य शासनाकडून आरक्षणाच्या तरतुदींनुसार सुधारित मागणीपत्रे प्राप्त झाल्यानंतर आयोगाने हा बदल केला आहे. एक वेळची विशेष बाब म्हणून वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना ही सवलत देण्यात आली असून, त्यांना ६ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. परीक्षा शुल्क भरण्यासाठी देखील ६ जानेवारी हीच अंतिम मुदत आहे.

हेही वाचा –  गडचिरोली पोलीस दलाच्या बळकटीसाठी ३४ नव्या वाहनांचा ताफा दाखल

दरम्यान, या निर्णयांतर्गत नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा केंद्रांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. अशा उमेदवारांना केवळ पुणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या सहा केंद्रांवरील उपकेंद्रांवर प्रवेश दिला जाईल. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून मेहनतीने अभ्यास करणाऱ्या मात्र तांत्रिक कारणास्तव संधी हुकलेल्या उमेदवारांना मोठा आधार मिळाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button