Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘निवडणूक आल्यावर येता, पाच वर्षे कुठे असता?’; अजित पवारांचा विरोधकांना सवाल

Ajit Pawar : बाकीच्या तालुक्यांतील परिस्थिती आणि आपली बारामतीची परिस्थिती बघा, मी म्हणणार नाही सगळं अलबेल आहे. आमचे विरोधक काही गल्ली बोळ दाखवतात. ही बारामती बघा आणि ती बारामती बघा. ते बदल फक्त अजित पवारच करु शकतो. विरोधक निवडणूक आली की येतात तुम्ही पाच वर्षे कुठं असता? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

बारामती नगरपरिषदेत आठ जण बिनविरोध केलेत, आता ३३ उमेदवार रिंगणात आहेत. १९९१ पासून तुम्ही मला साथ दिली, कधी सरकारमध्ये होतो कधी नव्हतो. बारामतीत निधी देत असताना दर्जेदार काम कसे होतील हेच मी बघितल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. उद्या लोकं विचार ऐकण्याच्या मनस्थितीत नसतील त्यामुळे मी आज सभा घेतली आहे. शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा मी कार्यकर्ता आहे. कधीही आपल्या जातीत धर्मात अंतर पडलेलं आपण बघितलं नाही. आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला शिकवलं आहे असंही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा –  कोकाटे यांचा राजीनामा, वर्षभरात राष्ट्रवादीच्या दुसऱ्या मंत्र्याला डच्चू

मी बारामतीच्या जेवढ्या बारकाईने गोष्टी बघत असतो तेवढा कोणी मायका लाल बघणार नाही हा माझा दावा आहे. विरोधक निवडणुकीच्या माध्यमातून बदनामी करण्याचा प्रयत्न करतायेत. विधानसभेच्या वेळी देखील हाच प्रयत्न झाल्याचे अजित पवार म्हणाले. तुम्ही उमेदवारांकडे बघू नका तुम्ही माझ्याकडे बघा त्यांच्याकडून काम करून घेण्याची माझी जबाबदारी असल्याचे अजित पवार म्हणाले. एवढंच नाही तर विरोधक निवडणूक आली की येतात एरवी कुठे असतात असाही सवाल त्यांनी केला. आपलं बजेट ४० ते ४५ कोटी आहे. आज मी सरकार मध्ये आहे. त्यामुळे मी काम करू शकतो. ४० ते ४५ कोटीत काहीच करू शकत नाही. माझ्या ओळखीनं केंद्रात आणि राज्यातला निधी आणू शकतो. कृषी विज्ञान केंद्राच्या उद्घाटनासाठी राज्यपालांना बोलावलं आहे. मंत्र्यांना उद्घाटन करता येणार नाही कारण आचारसंहिता आहे. बारामती प्रोजेक्ट पाच एकराचे नर्सिंग कॉलेज काढतो आहे. ५५ कोटीचं बजेट आहे. तिथेच १० एकरात कॅन्सर हॉस्पिटल करतो आहोत. तुम्ही फक्त साथ द्या असे अजित पवार म्हणाले. आज कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. लोकांना सांगतोय विडी ओढू नका तंबाखू नका गुटखा खाऊ नका असे अजित पवार म्हणाले.

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त दहा तारखेला जेवण ठेवलं होतं तिथे आम्ही गेलो होतो. त्यावेळी मला अनेकजण म्हणाले की दादा मला बारामती बघायला यायचे आहे. अनेक लोकांना कुतूहल आहे. हे कुतूहल दिल्लीमध्ये आहे हे मला पाहायला मिळाल्याचे अजित पवार म्हणाले. राज्यात महायुतीचे सरकार राहणार असल्याचेही अजित पवार म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button