पृथ्वीराज चव्हाण जगातील सर्वात मोठे भविष्यवेत्ते; चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला

मुंबई | येत्या १९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल, भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल, असा मोठा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वात मोठे भविष्यवेत्ते आहेत, असा टोला लगावला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांचा थोडा बुद्धिभ्रंश झाला आहे. त्यांना काहीही बोलण्याची सवय लागली आहे. कुठे पंतप्रधानपदाचे स्वप्न बघतात, कोण जाणार, कोण येणार, आता जगातील सर्वात मोठे भविष्यवेत्ते पृथ्वीराज चव्हाण हे झाले आहेत, असे मला वाटते.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये १७ लाख १३ हजार मतदार बजाविणार मतदानाचा हक्क !
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणुकीत भाजप महायुती म्हणून सोबत लढणार आहोत. २९ महापालिकांमध्ये ५१ टक्के मते मिळवून दोन तृतियांश बहुमताने आम्ही जिंकू, असा आम्हाला विश्वास आहे. महायुतीतील घटक पक्षांसोबत प्रत्येक महापालिकानिहाय आमची चर्चा सुरू आहे. महायुती म्हणून एकत्रितपणे लढण्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महायुतीच्या संदर्भात बैठक घेतली आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.





