पिंपरीत १७ वर्षाखालील कुमार गट निवड चाचणी कुस्ती स्पर्धा उत्साहात
वाकड येथे झालेल्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या युवा कुस्तीपटूंनी गाजवला आखाडा, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड

पिंपरी | पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षाखालील कुमार गट फ्रिस्टाईल व ग्रीकोरोमन निवड चाचणी कुस्ती स्पर्धा वाकड येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड परिसरातील उदयोन्मुख कुस्तीपटूंनी सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विशाल कलाटे, भारत केसरी विजय गावडे व संघाचे उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघाचे सरचिटणीस संतोष माचुञे, रतन लांडगे, काळूराम कवितके, कैलास जाधव, राजाभाऊ बालवडकर, किशोर नखाते, अजय लांडगे, बाबू चिंचवडे, कुंदन जाचक, विवेक शेलार, राजेश काळभोर, अनिल गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या निवड चाचणीतून निवडलेला पिंपरी चिंचवडचा संघ दि. १८ व १९ डिसेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार आहे. स्पर्धेत पंच म्हणून रोहिदास आमले, विजय कुटे, रूपेश जाधव, चंद्रकांत मोहोळ, बाळासाहेब काळजे व तुषार गोळे यांनी जबाबदारी पार पाडली.
हेही वाचा : महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला; २९ महापालिकांच्या निवडणुका जाहीर
फ्रिस्टाईल गटाचे निकाल पुढीलप्रमाणे :
४५ किलो – शिवम खोजे प्रथम, हर्ष नखाते द्वितीय.
४८ किलो – ओम नखाते प्रथम, महेश खोसे द्वितीय.
५१ किलो – सचिन देवासी प्रथम, शिवेंद्र नढे द्वितीय.
५५ किलो – सारंग बोर्हाडे प्रथम, जय गोडांबे द्वितीय.
६० किलो – कृष्णा तिकोणे प्रथम, अवधूत कदम द्वितीय.
६५ किलो – सार्थक किठे प्रथम, रतन वाघमारे द्वितीय.
७१ किलो – चैतन्य हिप्परकर प्रथम, अथर्व सांडभोर द्वितीय.
८० किलो – श्रीयन चिंचवडे प्रथम, स्वराज जाचक द्वितीय.
९२ किलो – शौर्य कुटे प्रथम.
११० किलो – ओमराज नखाते प्रथम, चैतन्य नखाते द्वितीय.
ग्रीकोरोमन गटाचे निकाल :
४५ किलो – अनिकेत गाडे प्रथम, शर्मन शिंदे द्वितीय.
४८ किलो – साई तांबे प्रथम.
५१ किलो – स्वजल दळवी प्रथम, कृष्णा कुरळे द्वितीय.
५५ किलो – प्रणव लांडगे प्रथम, राया गोडांबे द्वितीय.
६० किलो – ओमकार सुतार प्रथम, कृष्णा काटे द्वितीय.
६५ किलो – शौर्य खेडेकर प्रथम, सोहम घोगरे द्वितीय.
७१ किलो – दिगंबर फाले प्रथम, सार्थक वहिले द्वितीय.
८० किलो – मकरंद उकिर्डे प्रथम, वरद कवितके द्वितीय.
९२ किलो – प्रज्ञेश कुटे प्रथम, प्रविण लोखंडे द्वितीय.
११० किलो – प्रज्वल गोडांबे प्रथम, रूद्रराज नढे द्वितीय.
स्पर्धेचे सूत्रसंचालन संतोष माचुञे यांनी केले, तर आभार प्रदर्शन काळूराम कवितके यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले.




