Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला; २९ महापालिकांच्या निवडणुका जाहीर

१५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला लागणार निकाल!

मुंबई | राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोग यांच्यावतीने सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. मुंबई, ठाण्यासह राज्यातील सर्व २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणूक कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार नामनिर्देशन पत्रे ऑफलाईन पद्धतीने स्वीकारली जाणार असून राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.

महापालिका निवडणुकीमध्ये एकूण मतदार हे ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ इतके असणार आहेत. त्यामध्ये पुरूष मतदार हे १ कोटी ८१ लाख ९३६६६ इतके असतील, तर स्त्री मतदार १ कोटी ६६ लाख ७९७५५ असतील, इतर मतदार ४५९० असतील. ३९१४७ इतके मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.

हेही वाचा      :            पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘विकासाभिमुख हिंदुत्व’’ जागृती अभियान 

महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम:

  • नामनिर्देशन पत्र स्वीकारणे कालावधी – २३ ते ३० डिसेंबर २०२५
  • नामनिर्देशन पत्र छाननी- ३१ डिसेंबर २०२५
  • उमेदवारी अर्ज माघारीची मुदत – २ जानेवारी २०२६
  • निवडणुक चिन्ह वाटप अंतिम उमेदवार यादी ३ जानेवारी २०२६
  • मतदान – १५ जानेवारी २०२६
  • मतमोजणी – १६ जानेवारी २०२६

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button