Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी! बांगलादेशने दिली कांदा आयातीस परवानगी, दरात वाढ होण्याची शक्यता

Onion : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. बांगलादेशने कांदा आयातीस परवानगी दिली आहे. त्यामुळं या निर्णयाचा मोठा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह कांदा निर्यातदारांना होणार आहे. म्हणजे 7 डिसेंबर पासून प्रत्येक दिवशी 30 टनाचे 50 (आयपी) म्हणजे कांदा आयातीचे परवाने दिले जाणार आहेत. ज्या आयातदारांनी यासाठी अर्ज केले होते त्यांनाच आयपी परमीट मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एका दिवसाला 15 हजार क्विंटल कांदा भारतातून बांगलादेशमध्ये निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाचा कादा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळणारअसल्याची माहिती कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे. या निर्णयामुळं कांद्याच्या दरवाढीस चालना मिळणार आहे. त्यामुळं कांदा उत्पादकांना फायदा होणार आहे. सरकारने जर विविध देशात कांदा निर्यातील परवानगी दिली असती तर शेतकऱ्यांना कमी दरात कांदा विकण्याची गरज पडली नसती असे दिघोळे म्हणाले.

हेही वाचा –  क्लस्टरमुळे विकासाला वेग, मेट्रो आणि नव्या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार; ठाण्याला आधुनिक शहर बनवण्याचा संकल्प

इतर देशांनी जर अशीच भारतातून कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला तर कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पण या निर्णयाला उशीर झाला आहे. मात्र, तरीदेखील कांदा उत्पादक शेतकरी संघटना या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे दिघोळे म्हणाले. निर्यात वाढली तर कांद्याचे दर वाढतील. केंद्र सरकारने पुढील काळात कांदा निर्यातीस कोणतीही बंदी करु नये, याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळं भारतातील शेतकऱ्यांचा कांदा इतर देशांमध्ये जाईल याचा मोठा फायदा भारताच्या शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे भारत दिघोळे म्हणाले.

उन्हाळ कांद्याचे अवकाळी पावसात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच त्यानंतर राज्मुयातील विविध भागात पूरस्ळेथित देखील निर्माण झाली आहे. यामुळं देखील बऱ्याच ठिकाणी कांद्याचे पिकवाया गेले आहे. काही ठिकाणी पिके वाहून गेली तर काही ठिकाणी जमिनीच वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दर बऱ्यापैकी वाढले होते. यानंतर सद्यस्थितीला कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज दरातील घसरणीविरोधात प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात ट्रॅक्टर घेऊन आंदोलन केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button