अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाची चर्चा
लग्नाच्या रिसेप्शनला नंदिवरुन एण्ट्री केल्यामुळे प्राजक्ता गायकवाड चांगलीच ट्रोल
मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात सध्या एकापाठोपाठ असे कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे लग्न तर बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत होते. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मधील येसूबाईंच्या भूमिकेने घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताने व्यावसायिक शंभुराज खुटवड यांच्याशी लग्न केले आहे. लग्नातील थाटामाटानंतर आता त्यांच्या रिसेप्शनचीच सगळीकडे चर्चा आहे, कारण या जोडप्याने केलेली एन्ट्री खरंच अविस्मरणीय आणि रॉयल होती. पण एण्ट्रीमुळे त्यांना ट्रोल देखील केले जात आहे.
थेट नंदीवर बसून आली नवरी-नवरा!
रिसेप्शनला प्राजक्ता आणि शंभुराज यांनी चक्क एका भव्य-दिव्य नंदीवर स्वार होऊन एन्ट्री घेतली. मराठमोळ्या परंपरेला साजेशी ही राजेशाही एन्ट्री पाहून उपस्थित पाहुणे तर थक्कच झाले, पण सोशल मीडियावरील चाहतेही चकीत झाले. नंदी येताच आसमंतात रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी झाली आणि संपूर्ण वातावरण एखाद्या ऐतिहासिक चित्रपटासारखं स्वप्निल झालं. हा व्हिडीओ काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळवून व्हायरल झाला.
हेही वाचा – चऱ्होलीचे ग्रामदैवत वाघेश्वर महाराजांच्या साक्षीने अनुराधा साळुंके यांचा प्रचाराचा शुभारंभ !
नेटकऱ्यांनी केली टीका
सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताच्या रिसेप्शनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिला नंदीवरून येताना पाहून अनेकांनी टीका केली आहे. अभिनेत्री सुष्मा यांनी ‘हे फार चुकीच आहे आपल्याच देवांची मस्करी आहे ही आणि अस स्वतःला श्रेष्ठ ठरवल काय बोलायचं‘ अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका यूजने हा काय प्रकार आहे? असा प्रश्न विचारला आहे. अनेकांनी प्राजक्ताला ट्रोल केले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.
रिसेप्शनमध्ये ‘लाल परी’ बनली प्राजक्ता
लग्नात हिरव्या नऊवारीतील पारंपरिक महाराणी लूकमध्ये दिसलेली प्राजक्ता रिसेप्शनसाठी लाल रंगाची अतिशय सुंदर भरजरी साडी नेसून आली होती. सोनेरी जरीच्या नाजूक नक्षीकामाने खुललेली ही साडी आणि त्याला साजेशी नथ, मोत्यांचे दागिने यामुळे ती खरंच ‘लाल परी’ वाटत होती. शंभुराज यांनीही लाल साडीला मॅच करणारी मोत्याच्या शेडची शेरवानी घातली होती. दोघांचा हा जोडीदार लूक पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.




