मुंबईतून मोठी बातमी समोर! जे जे हॉस्पिटलजवळ मोठा अपघात
कन्स्ट्रक्शन मिक्सर कोसळल्याने सेफ्टी इंजिनियर गंभीर जखमी
मुंबई : मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. जे जे हॉस्पिटलजवळ मोठा अपघात झाला आहे. कन्स्ट्रक्शन मिक्सर कोसळल्याने एक सेफ्टी इंजिनियर गंभीर जखमी झाला आहे. भायखळा येथील एस ब्यु टी क्लस्टर 1 येथे काम सुरू असलेल्या इमारतीमध्ये क्रेनची केबल तुटून मोठा अपघात झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दलांचे जवान धटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
क्रेनची केबल तुटून अपघात
समोर आलेल्या माहितीनुसार, भायखळा येथील जे जे हॉस्पिटलजवळील भायखळा येथे एस ब्यु टी क्लस्टर 1 येथे काम सुरू असलेल्या इमारतीमध्ये क्रेनची केबल तुटून अपघात झाला आहे. या कन्स्ट्रक्शन साईटवर क्रेनच्या सहाय्याने सिमेंटचा डब्बा वर खेचून घेण्यात येत होता, मात्र केबल तुटल्याने अपघात झाला आहे. क्रेनची केबल तुटल्याने डब्बा खाली कोसळून भीषण अपघात झाला आहे.
हेही वाचा – ‘पालिका क्षेत्रातील विकासासाठी सरकारच्या मोठ्या योजना’; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
सेफ्टी इंजिनियर दानिश शेख जखमी
या अपघातात याच इमारतीचे सेफ्टी इंजिनियर दानिश शेख यांना गंभीर दुखापत झाली आहेत. या अपघातानंतर दानिश शेख यांना उपचारासाठी तात्काळ जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून सध्या पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.




