breaking-newsआंतरराष्टीय
पाकिस्तानकडून 12 भारतीय मच्छिमारांना अटक
कराची – पाकिस्तानी सागरी सुरक्षा यंत्रणेने पुन्हा आगळीक करत 12 भारतीय मच्छिमारांना अटक केली. भारतीय मच्छिमारांनी आमच्या सागरी हद्दीत अवैध शिरकाव केल्याचा कांगावा पाकिस्तानने केला. भारतीय मच्छिमारांच्या दोन नावाही जप्त करण्यात आल्या.
भारतीय मच्छिमारांना कराची पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मागील महिन्यातच पाकिस्तानी यंत्रणेने 16 भारतीय मच्छिमारांना अटक केली होती. भारत आणि पाकिस्तानमधील सागरी सीमा निश्चित करणाऱ्या योग्य तंत्रज्ञानाचा अभाव आहे. त्यामुळे दोन्ही देशांचे नागरिक असणारे मच्छिमार बऱ्याचदा अनावधानाने परस्परांच्या हद्दीत प्रवेश करतात. त्यांच्या अटकेच्या घटना सातत्याने घडतात. त्यानंतर दोन्ही देशांचे नागरिक असणाऱ्या मच्छिमारांना बराच काळ परस्परांच्या तुरूंगांमध्ये घालवावा लागतो.