Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

“मराठी भाषा भवन रखडलं, पण भाजपा कार्यालयासाठी वेगाने सूत्र हलली”; संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

मुंबई | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज (२७ ऑक्टोबर) मुंबई दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते दक्षिण मुंबईतील महाराष्ट्र भाजपाच्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या नेत्यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी भाजपावर जमीन बळकावल्याचा आरोप करत, या भूमिपूजनावर सवाल उपस्थित केले आहेत.

खासदार संजय राऊत म्हणाले, मरीन लाइन्सला अद्याप मराठी भाषा भवन होऊ शकलेलं नाही. भूमिपूजन होऊनही मराठी भाषा भवन अडकून पडलं आहे. त्याकडे कोणाचंही लक्ष जात नाही. मात्र, आज केंद्रीय गृहमंत्री मुंबईत येऊन भाजपाच्या पंचतारांकित कार्यालयाचं भूमिपूजन करत आहेत.

हेही वाचा      :        श्रेयस अय्यर गंभीर दुखापतीमुळे आयसीयूमध्ये; अंतर्गत रक्तस्त्रावामुळे वाढली चिंता

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल अजून हलली नाही. दिवाळी झाली तरी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. मात्र, भाजपाच्या पंचतारांकित हेडक्वार्टरची फाईल राफेलच्या वेगाने हलली. हे सगळं इतक्या वेगानं कसं झालं याचं रहस्य त्याच जमिनीखाली दडलं आहे. अमित शाह आज भूमिपूजन करत आहेत. त्यासाठी ते कुदळ मारतील तेव्हा हे रहस्य बाहेर येईल, असंही संजय राऊत म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group