Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM Kisanचा 21वा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता

PM Kisan 21st Installment : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या दिवाळीच्या सणासुदीच्या काळात, देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २१वा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार लवकरच ही बहुप्रतिक्षित २१वा हप्ता जारी करू शकते, ज्यामध्ये नेहमीप्रमाणे ₹२००० रुपये असणार आहेत.

पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹६००० रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. सरकारने आतापर्यंत २० हप्ते यशस्वीरित्या जारी केले असून, आता शेतकरी २१व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा हप्ता दिवाळीच्या शुभमुहूर्तावर किंवा त्यापूर्वीच खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा –  ‘GST 2.0 मुळे सणांना आली नवी झळाळी! रोजच्या वस्तू स्वस्त, लक्ष्मी पोहोचली घरोघरी’; अर्थमंत्री निर्मला सीतारामन

अनेक शेतकऱ्यांचे हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा होत नाहीत, कारण त्यांचे मोबाईल नंबर किंवा बँक तपशील अद्ययावत (अपडेट) केलेले नसतात. जर ओटीपी (OTP) मिळाला नाही किंवा माहिती चुकीची असेल, तर तुमचा हप्ता रोखला जाऊ शकतो. त्यामुळे, पैसे मिळण्यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी, आपल्या नोंदी तात्काळ अद्ययावत करणे आवश्यक आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button