Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत डीपीयू महाविद्यालयाचा अभिमानास्पद विजय!

शिक्षण विश्व: बॅडमिंटन स्पर्धेत डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी मुला मुलींच्या संघाला अजिंक्यपद

पिंपरी चिंचवड : निगडी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. सी.सी.ई.ई. महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी येथील मुला आणि मुलींच्या संघांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक पटकावत दोन्ही गटांत अजिंक्यपद मिळवले.

स्पर्धेची सुरुवात होताच या संघांनी आपली तयारी, प्रबळ आत्मविश्वास आणि उत्कृष्ट समन्वयाचे दर्शन घडवले. प्रत्येक सामन्यात त्यांनी आपल्या कौशल्याने प्रतिस्पर्ध्यांना नमवले. सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले. या यशामध्ये खेळाडूंनी घेतलेली मेहनत, तसेच, मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांचे आणि क्रीडा विभागाचे योगदानही अत्यंत मोलाचे ठरले.

हेही वाचा –  ‘रब्बीचे वाढते क्षेत्र लक्षात घेऊन आत्तापासूनच बियाणे, खतं, निविष्ठा यांचे नियोजन करा’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे निर्देश

हा दुहेरी विजय महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील एक सुवर्णक्षण ठरला असून, या यशामुळे संपूर्ण महाविद्यालय परिवाराचे मनोबल उंचावले आहे.या उत्तम कामगिरीबद्दल सर्व खेळाडूंना, त्यांच्या प्रशिक्षकांना आणि क्रीडा विभागाला डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर्व ट्रस्टींच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button